मावळसामाजिक

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी..

Spread the love

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी..Kranti Jyoti Savitribai Phule Jayanti is celebrated in New Maharashtra Engineering.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ३ जानेवारी.

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

आद्य शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या कार्याची माहिती प्राचार्य यांनी दिली. “सावित्रीबाईंचा निस्सीम त्याग व धैर्यामुळे आजच्या महिलेला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे”, असे बोलताना पुढे ते म्हणाले. याप्रसंगी डॉ. नितीन धवस, डॉ. सागर जोशी, डॉ. शेखर रहाणे, डॉ. सतीश मोरे, निबंधक विजय शिर्के, सुधाकर ढोरे, अविनाश पोटवडे, शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!