आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमावळ

महिंद्रा कंपनी व रोटरी क्लब कडून सावित्रीच्या लेकींना १३५ सायकल वाटप..

सावित्रीच्या लेकींची पायपीट थांबवूया" या उपक्रमांतर्गत सायकल देण्यात आल्या.

Spread the love

महिंद्रा कंपनी व रोटरी क्लब कडून सावित्रीच्या लेकींना १३५ सायकल वाटप.Distribution of 135 bicycles by Mahindra Company and Rotary Club to Savitri’s Lekki.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ३ जानेवारी.

महिंद्रा ऑटो स्टील प्रा.लि. चाकण यांच्या CSR फंडातून १०० सायकल व रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईट व रोटरी क्लब ऑफ चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या माध्यमातून नुकताच नवलाख उंबरे येथील श्रीराम विद्यालयात मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील प्रतिदिन ४ ते ९ किमी येजा करणाऱ्या विद्यार्थिनींना १३५ सायकल भव्य दिव्य समारंभात मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आल्या.

ग्रामीण भागातील आढले, दिवड, घोटकुले वस्ती, राजेवाडी, शिंदे वस्ती,शिवणे,थूगाव,मळवंडी, आंबी,वारंगवाडी,कातवी, नानोली,जाधववाडी, ठाकरवाडी, परीटवाडी, बधलवाडी,चावसर वस्ती, नवलाख उंबरे इ. गावांमधील शेतकरी,शेतमजूर, कामगार, आदिवासी,आर्थिक होतकरू कुटुंबातील १३५ विद्यार्थिनींना “सावित्रीच्या लेकींची पायपीट थांबवूया” या उपक्रमांतर्गत सायकल देण्यात आल्या. शाळांमध्ये रोटरी क्लबने सायकल बँक करण्याचा अभिनव उपक्रम राबवल्यामुळे विद्यार्थी ,पालक व नागरिकांमध्ये कौतुकाचा विषय झाला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना डीजी मंजू फडके यांनी रोटरी सिटीच्या कामकाजाचे कौतुक करताना विद्यार्थिनींना मौलिक संदेश दिला.सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्ही अभ्यास करून मोठ्या पदांवर जावं,आज तुम्हाला रोटरी क्लब ने व कंपनीने मदत केली आहे.उद्या तुम्ही सुद्धा भविष्यात इतरांना मदत करावी असा संदेश विद्यार्थिनींना रो मंजू फडके यांनी दिला.तसेच महिंद्रा कंपनीचे व्ही. पी. कमर्शियल दिवाकर श्रीवास्तव यांनी महिला सक्षमीकरण काळाची गरज असून कंपनीच्या माध्यमातून महिला ट्रेनिंग, सॅनिटरी मशीन वाटप इ.सह अनेक उपक्रम घेतले जातात, जेणेकरून पुढे जाऊन महिलांनी लघुउद्योग सुरू करून इतर महिलांना सक्षम करावं, त्यासाठी विद्यार्थिनींनी अभ्यास करून मोठं व्हावं त्यातून समाजाची उन्नती होईल असे प्रतिपादन दिवाकर श्रीवास्तव यांनी केले.*
*रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष रो.सुरेश शेंडे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाद्वारे मागील सहा महिन्यात क्लबने केलेल्या विविध समाज उपयोगी ४० उपक्रमांचा आढावा घेताना महिंद्रा कंपनी बरोबर झालेल्या उपक्रमांची माहिती विशद केली.सावित्रीच्या लेकींना शुभेच्छा देताना रोटरी सिटीच्या सायक्लोथाॅन या उपक्रमात लाभार्थी विद्यार्थिनी सायकल घेऊन आल्यास आम्हाला आनंद वाटेल असे प्रतिपादन सुरेश शेंडे यांनी केले.

तर रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी समाजातील विविध गरजू घटकांपर्यंत अनेक उपक्रमांच्या माध्यमातून मदत करत असते, अशा सेवाभावी क्लबला आम्ही भक्कमपणे मदत करू असे प्रतिपादन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष उद्योजक रामदास आप्पा काकडे यांनी केले व सावित्रीच्या लेकींना शुभेच्छा देताना शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही काकडे यांनी दिली.

डिस्ट्रिक्ट मेंबरशिप डायरेक्टर रो नितीन ढमाले, रोटरी सिटीचे संस्थापक अध्यक्ष रो. विलास काळोखे, ए .जी. शंकर हादिमनी, रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष रो.अशोक शिंदे, महिंद्रा कंपनीचे चीफ कमर्शियल विश्वजीत डे, हेड कमर्शियल प्रसाद पादिर, रो. किरण ओसवाल, शालेय समिती अध्यक्ष सुरेश शेटे यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाच्या आयोजकांचे कौतुक केले.

श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक गणपत कायगुडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी सिटीचे सेक्रेटरी रो.भगवान शिंदे यांनी केले तर रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष रो. यतीश भट यांनी उपस्थितांचे आभार मानले.उपस्थित मान्यवरांची श्रीराम विद्यालय नवलाख उंबरे व संत तुकाराम विद्यालय शिवणे येथील विद्यार्थ्यांनी ढोल ताशा व लेझीमच्या गजरात अनोख्या पद्धतीने वाजत गाजत मिरवणूक काढली.

रो.सुरेशनाना दाभाडे, रो.संजय वाघमारे, रो. विश्वास कदम,रो. रघुनाथ कश्यप, रो.दशरथ ढमढेरे, रो.प्रशांत ताये, रो.तानाजी मराठे, रो.प्रदीप टेकवडे, रो.संजय चव्हाण, रो.राजू कडलग, रो. मधुकर गुरव,रो.नवनाथ म्हसे, रो. बाळासाहेब चव्हाण,रो बसप्पा भंडारी, रो.अर्जुन वारिंगे, रो.सूर्यकांत म्हाळसकर,रो.बाळासाहेब रिकामे इ.सह महिंद्रा कंपनीचे दिनेश भोसले, बाबाराजे ढाकणे, संजय कुमार यादव, शशिकांत राजभर, दिग्विजय सुतार, मंगेश जाधव तसेच श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!