क्रीडा व मनोरंजनसामाजिक

कौठळी शाळेत बालिका दिन साजरा..

जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती "बालिका दिन" म्हणून साजरी करण्यात आली.

Spread the love

कौठळी शाळेत बालिका दिन साजरा..Girl’s day celebration in Kauthali school..

आवाज न्यूज  : प्रतिनिधी श्रावणी कामत, ३ जानेवारी.

दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती “बालिका दिन” म्हणून साजरी करण्यात आली. प्रथम सरपंच रुपाली मारकड, आरोग्य सेविका सुरेखा फरांदे, आशा सेविका मनिषा चितारे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

भारत ननवरे सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.विद्यार्थी मनोगते झाली. आरोग्य सेविका सुरेखा फरांदे यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती सांगितली. जयंती निमित्त शाळेत रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमास सरपंच रुपाली मारकड, माजी सरपंच राणी मारकड,आरोग्य सेविका सुरेखा फरांदे,आशा सेविका मनिषा चितारे,मधुरा मारकड,आरोग्य सेवक सोमनाथ कांबळे सह पालक,विद्यार्थी उपस्थित होते. भारत ननवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!