क्रीडा व मनोरंजननगरपरिषदमहाराष्ट्रमावळ

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यक्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रा संपन्न..

कार्यक्रमासाठी तळेगाव दाभाडे शहरातून 1460 लाभार्थी सहभागी..

Spread the love

’तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यक्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रा संपन्न ; कार्यक्रमासाठी तळेगाव दाभाडे शहरातून 1460 लाभार्थी सहभागी.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ३ जानेवारी.

केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत या दृष्टीने तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यक्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रा दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी आली. केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाद्वारे या संकल्प रथाची रचना करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा तळागाळातील लाभार्थ्यांना लाभ मिळावा व सर्वांना या योजनांची माहिती व्हावी हा या विकसित भारत संकल्प यात्रेचा मूळ हेतू आहे. तळेगाव दाभाडे शहरामध्ये विकसित भारत संकल्प यात्रा रथ सकाळी 10 ते 1 या वेळेत नगरपरिषद कार्यालय, मारुती मंदिर चौक येथे व दुपारी 2 ते 5 या वेळेत मराठा क्रांती चौक येथे आला होता. या कार्यक्रमासाठी तळेगाव दाभाडे शहरातून 1460 लाभार्थी सहभागी झाले असून वेगवेगळ्या योजनांबाबत त्यांनी माहिती घेतली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत प्रधानमंत्री स्वनिधी, प्रधानमंत्री स्वनिधी से समृद्धी, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), आयुष्यमान भारत योजना, आरोग्य विभाग योजना, आधार अपडेट, स्वच्छ भारत अभियान (नागरी) प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना, बँकामार्फत विविध कर्ज योजना, इत्यादी योजनांची माहिती यावेळी नागरिक व लाभार्थी यांना देण्यात आली.

या कार्यक्रमाचे सर्व नियोजन तळेगाव दाभाडे नगरपरिषदे मार्फत करण्यात आले होते. विकसित भारत संकल्प यात्रेचे विशेष आकर्षण हा संकल्प रथ असून विविध योजनांची माहिती देणारी छायाचित्रे व जनजागृती पर बॅनर पोस्टर्स या रथावर लावण्यात आलेली आहेत. या कार्यक्रमाचे उदघाटन माजी राज्य मंत्री. बाळाभाऊ भेगडे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते. तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना आपला संकल्प विकसित भारत शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर वाघमारे यांनी केले तसेच मुख्याधिकारी. एन. के. पाटील यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!