आरोग्य व शिक्षण

मावळ तालुक्यात बजाज covid-19 लसीकरण मोहिमे अंतर्गत विक्रमी 17422 जणांचे लसीकरण

Spread the love

मावळ : तालुक्यात 31 ऑगस्ट रोजी बजाज  covid-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत एकाच दिवसात विक्रमी 17422 जणांचे लसीकरण करण्यात आले.

सकाळी आठ पासून सायंकाळी सात नंतर देखील लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तालुक्‍यात लोणावळा शहरात सर्वाधिक तब्बल 5078 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दुपारी तीन वाजेपर्यंत लस अपुरी पडल्याने पुन्हा नवीन लस उपलब्ध करून देण्यात आली.

संपूर्ण तालुक्यात 31ऑगस्ट रोजी बजाज विशेष covid-19 लसीकरण मोहीम जिल्हा परिषद व बजाज कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली गेली होती. या मोहिमेला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. मावळातील एकूण 57 केंद्रात संध्याकाळपर्यंत 17422 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले.

नागरिकांनी लस घेण्यासाठी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ झाली. तरीही नागरिकांनी या मोहिमेला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला. इतर वेळी लसीकरणासाठी वणवण करावी लागत असल्याने नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.

सदर लसीकरण मोहिमेस आमदार सुनिल अण्णा शेळके,कृषी पशुसंवर्धन सभापती जिल्हा परिषद पुणे  बाबुराव आप्पा वायकर ,पंचायत समिती सभापती महोदया ज्योती शिंदे, उपसभापती  दत्तात्रय शेवाळे,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे  आयुष प्रसाद ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार  माजी पंचायत समिती सभापती गुलाबकाका म्हाळसकर, माजी पंचायत समिती उपसभापती शांताराम कदम यांनी सर्वत्र भेटी देऊन लसीकरण केंद्रांची पाहणी केली.

केंद्रनिहाय लसीकरण पुढीलप्रमाणे ::

1) ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ कान्हे ::
अंतर्गत केंद्र 01 ::
एकुण लसीकरण :: 679

2) उपजिल्हा रुग्णालय लोणावळा
अंतर्गत केंद्र 14::
एकुण लसीकरण :: 5078

3) प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे
अंतर्गत केंद्र :: 07
एकुण लसीकरण :: 3135

4) प्राथमिक आरोग्य केंद्र टाकवे बुद्रुक
अंतर्गत केंद्र :: 05
एकुण लसीकरण :: 1312

5) प्राथमिक आरोग्य केंद्र खडकाळा
अंतर्गत केंद्र :: 14
एकुण लसीकरण :: 2910

6) प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला
अंतर्गत केंद्र :: 05
एकुण लसीकरण :: 1884

7) प्राथमिक आरोग्य केंद्र आढले
अंतर्गत केंद्र :: 07
एकुण लसीकरण ::1482

8) प्राथमिक आरोग्य केंद्र येळसे
अंतर्गत केंद्र :: 04
एकुण लसीकरण ::942

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!