Puneमहाराष्ट्रसामाजिक

सावित्रीबाई फुले जयंती विविध कार्यक्रमांनी संपन्न.

Spread the love

सावित्रीबाई फुले जयंती विविध कार्यक्रमांनी संपन्न.Savitribai Phule Jayanti was celebrated with various programs.

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी ४ जानेवारी.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दि.३ रोजी राष्ट्रीय विद्यार्थी कॉग्रेसकडून सावित्रीबाई फुलेंची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . जयंतीनिमित्त ‘लोकशास्त्र सावित्री ‘ या वैचारिक नाटकाचे संत नामदेव सभागृहात सादरीकरण करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना एमपीएससी ची पुस्तके भेट देण्यात आली . कार्यक्रमाला तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला.

“विद्यापीठातील बंद पडलेली सांस्कृतिक चळवळ पुन्हा बळकट करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले तसेच येत्या काळात सांस्कृतिक चळवळीतून निर्माण होणारी ऊर्जा सामाजिक – राजकीय क्षेत्रात दिसून येईल असा विश्वास अक्षय कांबळे यांनी व्यक्त केला. विज्ञान शाखेतून शिकून मोठी झालेल्या माणसांमधील वाढती धर्मांधता आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव ही दुःखद बाब असल्याची खंत डॉ.राजाभाऊ भैलुमे यांनी व्यक्त केली.

अक्षय कांबळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय विद्यार्थी कॉग्रेस ( NSUI ) ने लोकसेवा अकॅडमी आणि स्टेपअप अकॅडमी यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन केले होते . कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा . डॉ . राजाभाऊ भैलुमे तर उद्घाटक म्हणून, कुलसचिव डॉ. विजय खरे मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे उपस्थित होते . तसेच , NSUI चे आमीर शेख , बळीराम डोळे ,प्रा. रुक्साना पाटील , प्रा.अमोल सरवदे , सागर सोनकांबळे , राहुल ससाणे , युवा सरपंच मुन्ना आरडे यांनी उपस्थिती लावली . कार्यक्रमाचे व्यवस्थापन NSUI चे शकील शेख , रवीराज कांबळे , सिध्दांत जांभूळकर , बालाजी मिसाळ , सोमनाथ अंबोरे , तर सूत्रसंचालन निकीता सिद्धगणेश , मीरा अंभुळे आणि स्वाती सातपुते यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!