आरोग्य व शिक्षणसामाजिक

श्रीदत्तजयंतीनिमित्त प्रेमनगरमधे सुमारे शंभर लोकांची नेञतपासणी..

Spread the love

श्रीदत्तजयंतीनिमित्त प्रेमनगरमधे सुमारे शंभर लोकांची नेञतपासणी ; अकरा रूग्णांची शस्ञक्रिया साठी निवड.On the occasion of Shri Dutt Jayanthi in Prem Nagar, about one hundred people were interviewed; Eleven patients were selected for surgery.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी,५ जानेवारी.

श्रीदत्तजयंतीनिमित्त प्रेमनगरमधे सुमारे शंभर लोकांची नेञतपासणी करण्यात आली. त्यातील सुमारे अकरा रूग्णांची शस्ञक्रिया साठी निवड झाली. यावेळी श्री स्वामी शंकर चिले सेवा मंडळांच्यावतीने शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. प्रेमनगमधील ग्रामस्थ व श्री गुरूदत्त तरूण मंडळाचे कार्यकर्ते यांचेकडून यावेळी उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यात आले.

या शिबीरामधे डाॕ.जिवक मोहिते व आयुर्वेदतज्ञ कविता मॅडम परिचारिका निलम येवले यांनी रूग्णांची तपासणी केली. त्यांना औषधे, गोळ्या देण्यात आल्या.
सामाजिक कार्यकर्ते, फोटोग्राफर मनिष बोडके, श्री स्वामी समर्थ शंकर चिले सेवा मंडळाचे पदाधिकारी भरतशेठ परदेशी ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

केवरे वसाहतीजृवळ प्रेमनगरमधे श्रीदत्त मंदिरात श्रीदत्तजयंतीनिमित्त भजन, कीर्तन, हरिपाठ, प्रवचन आणि श्री दत्त जन्म, पाळणा, सुंठवडा वाटप तसेच भंडारा महाप्रसाद असा कार्यक्रम ग्रामस्थांचे व मंडळांच्यावतीने उत्साहात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!