क्रीडा व मनोरंजनलोणावळा

व्ही.पी.एस इंग्लिश टिचींग स्कूल,लोणावळा मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन उत्साहात साजरे.

Spread the love

व्ही.पी.एस इंग्लिश टिचींग स्कूल,लोणावळा मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन उत्साहात साजरे.VPS English Teaching School, Lonavala celebrated the inauguration of annual sports competitions with enthusiasm.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, ६ जानेवारी

विद्या प्रसारिणी सभा,पुणे येथील व्ही.पी.एस इंग्लिश टिचींग स्कूल,लोणावळा मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन उत्साहात साजरे झाले.शुक्रवार दिनांक 05 जानेवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व्ही.पी. एस हायस्कूल चे उपप्राचार्य.दहिफळे सर आणि क्रीडा विभाग प्रमुख सौ रेवती बोके ह्या उपस्थित होत्या.शाळेच्या मुख्याध्यापिका.भारती लोखंडे मॅडम ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.5 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत शाळेत विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रसंगी बोलताना दहिफळे सर यांनी खेळ व व्यायाम यांच्याबरोबर सकस आहार याचे महत्व विषद केले.तसेच सौ.रेवती बोके मॅडम यांनी खेळाद्वारे विद्यार्थ्यांच्या शारिरीक व मानसिक विकास होत असल्याचे सांगितले.मुख्याध्यापिका  लोखंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व क्रीडा विभाग प्रमुख.अंकुश वाघुलकर यांच्या नियोजनानुसार पुढील आठ दिवसात ह्या क्रीडा स्पर्धा पार पडणार आहेत.या उद्घाटन प्रसंगी श्रीमती व्हर्जिनिया रॉइझ यांनी इयत्ता 4 थी च्या विद्यार्थ्यांनी बसवलेले मानवी मनोरे दाखवण्यात आले.तसेच बाळासाहेब खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बसवलेले मार्च पास्ट चे सादरीकरण करण्यात आले.अंकुश वाघुलकर यांनी खेळाचे नियम अटी यांची विद्यार्थ्यांना शपथ दिली सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

संस्थेच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे मॅडम,कार्यवाह डॉ.सतीश गवळी सर,सहकार्यवाह.विजय भुरके सर,शाळा समिती अध्यक्ष.कन्हैया भुरट सर यांनी क्रीडा स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.मुख्याध्यापिका.लोखंडे मॅडम यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन अनिकेत रासकर व आभार प्रदर्शन मंजूषा महापुरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!