ताज्या घडामोडी

कलापिनी आणि मा. आमदार कृष्णराव भेगडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सरत्या वर्षांत समारंभ २०२३ दिमाखात संपन्न……

कला दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन..

Spread the love

कलापिनी आणि मा. आमदार कृष्णराव भेगडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सरत्या वर्षांत समारंभ २०२३ दिमाखात संपन्न……कला दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ६ जानेवारी.

कलापिनी आणि मा.आमदार कृष्णराव भेगडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कलापिनीच्या कै. शं वा परांजपे रंगमंचावर वर्षांत समारंभ २०२३ दिमाखात पार पडला.

या महोत्सवाचे हे २६ वें वर्ष होते. मास्क पॉलिमरच्या अध्यक्षा राजश्री म्हस्के प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, कार्याध्यक्षा  अंजली सहस्रबुद्धे, विश्वस्त डॉ .अनंत परांजपे, उपाध्यक्ष  अशोक बकरे, कोषाध्यक्ष श्रीशैल गद्रे ,सचिव  हेमंत झेंडे, मिलिंद मालकर उपस्थित होते.

कलापिनी आणि मा. आमदार कृष्णराव भेगडे प्रतिष्ठानतर्फे वर्षांत सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले. मा. पं किरण परळीकर यांना साहित्य, काव्य, नाटय, सामजिक कार्य, अर्थकारण या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले. ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते  प्रदीप जोशी यांना अभिनय व संगीताचा वारसा चालवितानाच दिव्यांग मुले व त्यांच्या शिक्षकांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.तर वन्यजीव मावळ संस्थेचे संस्थापक, नैसर्गिक संकटात सापडलेल्यांची मुक्तता करणारे, दुर्मिळ प्राणी पक्षी यांचे रक्षण करणारे, वृक्षप्रेमी निलेश गराडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आले. वर्षांत सितारा म्हणून नृत्य दिग्दर्शक राहुल देठे यांना गौरविण्यात आले.

पं. किरण परळीकर यांनी कै. डॉ. शं. वा. परांजपे यांच्या कलापिनी उभारण्यासाठी केलेल्या जिद्द व चिकाटीच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. तर कलापिनीतून आपली अभिनय कारकीर्द सुरू झाल्याचे अभिनेते प्रदीप जोशी यांनी सांगितले. कलाक्षेत्रा व्यतिरिक्त त्यांच्या कार्याची दखल घेतल्या बद्दल  निलेश गराडे यांनी संस्थेचे आणि डॉ. अनंत परांजपे यांचे आभार मानले. राजश्री म्हस्के यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची प्रशंसा केली आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.या वेळी उपशास्त्रीय गायिका विभावरी बांधवकर, गौरी गोडंबे यांचा पण सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी कलापिनी कलादिग्दर्शिका २०२४ चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मुख्य कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय कुलकर्णी,सौ.रश्मी थोरात,अविनाश शिंदे,मीनाक्षी झेंडे,सौ माधुरी कुलकर्णी यांनी केले.

सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी कै. शं वा परांजपे रंगमंचावर जवळजवळ ४५० ते ५०० कलाकारांनी आपली कला सादर केली.३२..३३ संस्थांनी आपली कला सादर केली. दिगंबर कुलकर्णी यांच्या विठू माऊली तू माऊली जगाची या भक्तीगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डान्स मेनिया ग्रुपची बहारदार नृत्ये, संतकृपा शाळा कान्हे येथील विद्यार्थ्यांचे अभंग गायन व पखवाज व संवादिनी वादन, संत जगद्गुरु संघाचे मृदुंग वादनाच्या तालचक्राने व दिंडीने साक्षात पंढरपूर रंगमंचावर अवतरले. कलापिनी बालभवनच्या छोट्या दोस्तांनी बालगीतावर केलेल्या निरागस नृत्याने रसिकांना बालपणात नेले. पंचकोष योगशाळेने देशभक्तीपर गीतावर योग प्रात्यक्षिके सादर केली. कलापिनी कुमारभवनचे सैनिकांच्या देशभक्तीपर गीतांवरील नृत्याने सैनिकांबद्दल आदर निर्माण करता झाला, मंगेश साळुंखे ग्रुप, स्टेप हार्ड डान्स अकॅडमी यांचे दिलखेचक नृत्याविष्कार, तसेच ओ एस के मार्शल आर्टची स्वसंरक्षणार्थ कराटे प्रात्यक्षिके अवाक करणारी होती. गायन, नृत्य, मृदुंग वादन, तबला वादन, आर्टिस्टीक योगा, मार्शल आर्ट, फॅशन शो यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

अविनाश शिंदे यांनी मुख्य जबाबदारी उचलली. प्रतिक मेहता, शार्दुल गद्रे, विपुल परदेशी, अभिलाष भवर, ऋषिकेश कठडे, दिपांशू सिंग,प्रशांत धुळेकर,कलापिनी महिला मंच यांनी या कार्यक्रमासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. शिस्तबध्द, संस्कृती जोपासणारा दर्जेदार कार्यक्रम पहायला मिळाल्याने रसिक आनंदून गेले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!