आरोग्य व शिक्षणमावळ

तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित- जी एन एम नर्सिंग विद्यार्थ्यांचा- प्रसन्न पवित्र सेवाव्रती शपथविधी समारंभ संपन्न.

Spread the love

तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित- जी एन एम नर्सिंग विद्यार्थ्यांचा- प्रसन्न पवित्र सेवाव्रती शपथविधी समारंभ संपन्न.Talegaon General Hospital Conducted- GNM Nursing Students- Prasanna Pious Sevavrat Oath Ceremony Concluded.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ७ जानेवारी.

दीप प्रज्वलनानंतर प्राचार्य मोनालिसा पारगे मॅडम यांनी समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर शालिग्राम भंडारी आणि- प्रमुखपाहुण्या भारती विद्यापीठ संचलित नर्सिंग स्कूलच्या प्राचार्या डॉ वीना साखरदंडे या मान्यवरांचं– सभागृहातील उपस्थितांच्या वतीने शनिवार दिनांक सहा जानेवारी 2024 रोजी यथोचित स्वागत केलं! त्यानंतर नर्सिंग स्कूल प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा लाइटिंग लॅम्प च्या प्रतिकात्मक स्वरूपाने रुग्णसेवेचा शपथविधी समारंभ विधिवत संपन्न झाला.

नर्सिंग क्षेत्रातील – अनुभवसंपन्न प्राचार्य डॉक्टर विना साखरेदंडे यांनी- – विद्यार्थ्यांना शपथ देताना आपल्या रुग्णसेवेतील कार्य कर्तव्य क्षमतेची जाणीव अतिशय योग्य शब्दात देऊन शपथ दिली!अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉक्टर शालिग्राम भंडारी म्हणाले की- आपण हे रुग्णसेवेचे व्रत अंगीकारित असताना आपण सर्व खरोखरच भाग्यवान आहात! भाग्यवान अशा अर्थाने आहात की- शंभरवर्षाची आरोग्यसेवेची उज्वल परंपरा असणाऱ्या तळेगाव जनरल हॉस्पिटल सारख्या उत्तम संस्थेत शिक्षण आणि संस्कार आत्मसात करण्याची संधी आपल्याला लाभलेली आहे.

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्याप्रमाणे आपण कैवल्याचे धनी होणार आहात! हा अत्यंत पवित्र प्रसन्न शपथविधी समारंभ सर्वर्थाने यशस्वी होण्यास संस्थेच्या शैक्षणिक- व्यवस्थापकीय विभागा इतकेच विशेष परिश्रम विद्यार्थ्यांनी घेतलेत त्यात —-सूत्रसंचालन – ज्योती सूर्यवंशी आणि नीलम येवले, आथितीचे स्वागत – प्राचार्य मोनालिसा पारगे मॅडम, स्वागतगीत – द्वितीयवर्षाचे विद्यार्थी!, शपथविधी – उपप्राचार्य क्रिस्टिना रणभिसे, कार्यक्रमाची सांगता – सीनिअर ट्यूटर – युक्ता नलावडे! ध्वनी व्यवस्था – अभिषेक बुग्गे, फोटोग्राफी – परमेश्वर राठोड, स्वागतगीत – द्वितीय वर्षाचे विद्यार्थी! संपूर्ण नियोजन – तृतीय वर्षाचे विद्यार्थी! या सर्वांचा विशेष उल्लेख करावा लागेल! सर्व मान्यवर- विद्यार्थी- पालक आणि शिक्षकांची या यशस्वी देखण्या समारंभाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!