ताज्या घडामोडीनगरपरिषदमावळसामाजिक

तळेगावातील ञस्त महिलांनी पाण्यासाठी उपमुख्याधिकारी  ममता राठोड यांना दिले निवेदन..

दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन. संतोष भेगडे तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात पाण्यासाठी उपमुख्याधिकारी  ममता राठोड यांना देण्यात आले निवेदन ; दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन. संतोष भेगडे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तळेगाव दाभाडे.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ८ जानेवारी.

तळेगाव दाभाडे – सोमवार, दिनांक – ०८ जानेवारी २०२४ नवीन वर्षाच्या सुरवातीलाच तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील श्रीनगरी फेज २, डोळसनाथ आळी, माळी आळी, भेगडे आळी येथील महिलांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात पाण्यासाठी निवेदन देण्यात आले. श्रीनगरी फेज २ या भागात गेल्या महिना भरापासून अनियमित व कमी पाणी पुरवठा केला जात आहे. या भागातील नागरिकांना स्वखर्चाने पाण्याचे टँकर मागवून पाणी गरज भागवत आहे.

सतत मागणी करून व निवेदन देवूनही नगरपरिषद प्रशासनाने पाण्यासंदर्भात उपाययोजना न केल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी प्रशासनाचे आपल्या समस्येकडे लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये निवेदन देण्यात आले .

यावेळी उपस्थित तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी  ममता बाबुराव राठोड यांनी ०२ दिवसांत या समस्येचे निराकरण होईल व पाणी पुरवठा सुरळीत व नियमित वेळेवर केला जाईल असे आश्वासन उपस्थित महिलांना दिले. तसेच दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष भेगडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!