ताज्या घडामोडी

श्री विठ्ठल मंदिर शाळा चौक येथे कसाबी परिवाराच्या वतीने श्री संताजी महाराज जगनाडे महाराज यांची होणार पुण्यतिथी साजरी.

ह. भ. प. श्री संतोष महाराज काळोखे देहूकर यांचे सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला.

Spread the love

श्री विठ्ठल मंदिर शाळा चौक येथे कसाबी परिवाराच्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांची होणार पुण्यतिथी साजरी ; ह. भ. प. श्री संतोष महाराज काळोखे देहूकर यांचे सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर ८ जानेवारी.

संतश्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे गाथा लेखक संतश्रेष्ठ शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीच्या औचित्य साधून संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री विठ्ठल मंदिर शाळा चौक तळेगाव दाभाडे येथे कसाबी परिवाराच्या वतीने पुण्यतिथीच्या निमित्त सकाळी सहा वाजता महापूजा व संध्याकाळी ह भ प श्री संतोष महाराज काळोखे देहूकर यांचा सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

तदनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा. अशी माहिती नित्योपचार समितीचे संस्थापक श्री ह.भ.प ज्ञानेश्वर (माऊली) महाराज दाभाडे व प्रसिद्ध प्रमुख  सोनबा गोपाळे गुरुजी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!