ताज्या घडामोडी

चार गायी, तीन वासरे आणि दोन बैलांची कत्तलीपासून सुटका..

बजरंगदल गोरक्षक विभाग यशस्वी  वडगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल.

Spread the love

चार गायी, तीन वासरे आणि दोन बैलांची कत्तलीपासून सुटका ; बजरंगदल गोरक्षक विभाग यशस्वी  वडगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल.four cows, three calves and two bulls saved from slaughter; Bajrang Dal Cow Guard Division Succeeded Vadgaon Police registered a case.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, ९ जानेवारी.

चार गायी , तीन वासरे आणि दोन बैलांची कत्तलीपासून सुटका करण्यात बजरंगदल गोरक्षक विभाग यशस्वी झाला आहे. कुसूर घाटमार्गे ही जनावरे कोकणात नेण्यात येणार होती, पण भीमाशंकर जिल्हा गोरक्षा प्रमुख यांचे सावधानपणे कारवाईमुळे या चार गायींचे, दोन बैल व तीन लहान वासरांचे प्राण वाचवण्यासाठी अनेकांनी प्रयत्नांची शर्थ करून धडक कारवाई केली.

यावेळी ” जय श्रीराम, बजरंगबली की जय, जय भवानी जय शिवाजी ! ! असा जयघोष घुमला.
गेले काही वर्षांपासून अंदर मावळ, नाणे मावळ या परिसरातील गायी, बैल, वासरे चरताना पकडून ही मुकी जनावरे कत्तलीसाठी पायी चालवत कुसुर घाट मार्गे कर्जत कोकण विभाग येथे नेण्यात येत आहेत, अशी माहिती बऱ्याच दिवसांपासून विश्व हिंदु परिषद, बजरंग दल व भीमाशंकर जिल्हा गोरक्षाप्रमुख योगेश शेटे यांना मिळत होती.

८ते१० दिवसांपूर्वी काही जनावरे एका गाडीमध्ये कूसुर या ठिकाणी घेऊन जात असताना कारवाई करण्यात आली होती. बऱ्याच दिवसांपासून मावळ मधील बजरंगदल चे कार्यकर्ते या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. २ते३दिवसांपासून गोरक्षकांना खबर मिळाली होती की काही जनावरे शिरदे, सोमवडी भागातून एकत्रित करून डोंगर, पायवाटेने कुसुर मध्ये एकत्र करून घाट मार्गे चालत कर्जत ला नेणार आहे. तेव्हापासून योगेश शेटे व बजरंग दलचे कार्यकर्ते या हालचालींवर बारीक नजर ठेऊन होते. व काल कुसुर गावातील जंगलामध्ये ही जनावरे एकत्र करून कुसुर घाट मार्गे पायी नेताना कारवाई केली.,यामध्ये ४ गावरान गाय,२ बैल व ३ वासरे होती. सर्व जनावरे कार्यकर्त्यांनी या जनावरांना कत्तलीपसून वाचवण्यात आले व महाराष्ट्र प्राणी सुधारणा कायद्ये अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत वडगाव मावळ पो.स्टेशन मध्ये कायदेशीर कारवाई करून जनावरे सुखरूप भोसरी येथील पांजरपोळ गोशाळे मध्ये सोडण्यात आली.या कारवाई मध्ये स्वप्निल डेनकर, अशोक तुर्डे, अनिकेत शिंदे, आकाश बेलेकर,राहुल पठारे, योगेश ढोरे, पै.जयेश काळडोके, निखिल तारू, विजय आंबेकर, नवनाथ भोसले, विस्वास ढाकणे,भावेश ठोंबरे, महेश ठोंबरे, प्रणाल निंबाळकर यांनी सहभाग घेतला.

विशेष सहकार्य शिवराज रोडवेजचे मछिंद्रभाऊ गाडे व आकाशभाऊ वारुळे यांचे सहकार्य लाभले. मिलिंद भाऊ एकबोटे यांनी मार्गदर्शन केले. वडगाव पोलिस स्टेशननी चांगले सहकार्य केले. अशी माहिती
अभिजीत चव्हाण,( बजरंगदल गोरक्षा विभाग ) अखिल भारत कृषी गोसेवा संघ यांचेकडून प्रसिद्धीस देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!