क्रीडा व मनोरंजनपिंपरी चिंचवड

प्रतिभा ज्युनियर कॉलेजमध्ये पालक सभा संपन्न.

Spread the love

प्रतिभा ज्युनियर कॉलेजमध्ये पालक सभा संपन्न.Parent meeting held at Pratibha Junior College.

आवाज न्यूज : गुलामअली भालदार, चिंचवड प्रतिनिधी १० जानेवारी.

चिंचवड येथील कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता बारावी च्या विद्यार्थी पालक सभा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. ही पालक सभा विज्ञान आणि कला व वाणिज्य अशा दोन टप्प्यात झाली. या सभेत पालकांचा उत्फुर्त प्रतिसाद होता.

महाविद्यालयाच्या उपप्रचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी पालकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेसंदर्भातील महत्वाच्या सूचना दिल्या. तसेच परीक्षा अगदी तोंडावर आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी कसून अभ्यास करावा व पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवून त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे. तसेच त्यांनी बोर्डाच्या दृष्टीने अनेक नियम व सूचना पालकांसमोर ठेवून या नियमांचे विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे पालन करावे. अशा प्रकारे पालकांशी प्रश्नोत्तर संवादातून संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन ही केले. पालक सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे सभा उत्साहात पार पडली.

या सभेस संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, उपप्रचार्या डॉ.वनिता कुऱ्हाडे, विज्ञान, कला व वाणिज्य शाखेच्या समन्वयिका डॉ. सुनीता पटनायक, प्रा.जसमीन फरास, प्रा.वैशाली देशपांडे तसेच सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
या सभेचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र निरगुडे व डॉ.अर्चना भट्टाचार्य यांनी केले तर; आभार प्रदर्शन डॉ. सुनीता पटनाईक व प्राध्यापिका वैशाली देशपांडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!