आरोग्य व शिक्षण

निरोगी आरोग्यासाठी सूर्यनमस्कार हाच सर्वोत्तम व्यायामप्रकार – सुधीर बंडगर

Spread the love

भारतीय असणारा सूर्यनमस्कार हा व्यायाम प्रकार शरीराच्या सर्वं अंगाना सांध्याना , इंद्रीयाना व्यायाम देणारा व्यायाम प्रकार आहे. शारीरिक व मानसिक निरोगी आरोग्यासाठी महत्वाचा असणारा सूर्यनमस्कार हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार असल्याचे प्रतिपादन योगशिक्षक श्री. सुधीर बंडगर यांनी केले .

 

आरळा ( ता. शिराळा ) येथील गांधी सेवाधाम माध्य. व उच्च माध्य. विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सुर्यनमस्कार दिना निमित्त ते बोलत होते. ते म्हणाले कमीत कमी वेळेत शरीराच्या जास्तीत जास्त भागांना सूर्यनमस्कार मुळे व्यायाम मिळतो. कोणत्याही वयात सहजपणे करण्यात येणारा हा व्यायाम प्रकार आहे. सूर्यनमस्कारामूळे शरीर बळकटीत वाढ ,लवचिकतेत वाढ , वजन नियंत्रण , पचन शक्तीत सुधारणा , चरबी कमी करणे , मानसिक , शारीरिक थकवा जाणे , मन शांत व स्थिर होणे , सांधे , स्थायू दुखी थांबणे इत्यादी फायदे नियमित सूर्यनमस्कार घातल्याने होतात. शरीर तंदुरुस्त ठेवणारा हा व्यायाम नियमितपणे सर्व विद्यार्थ्यानी करावा असे आवाहनही त्यांनी केले. जगाला आरोग्य विषयक मार्गदर्शन करणाऱ्या या व्यायाम प्रकाराचे महत्व प्रसार व प्रचार करून भावी पिढी निरोगी घडवण्याचे कार्य प्रत्येकाने करणेही महत्वाचे असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदशनात नमूद केले. यावेळी सूर्यनमस्कार घालण्याच्या योग्य पद्धती विषयी बंडगर संरानी प्रात्यक्षिका सह माहिती दिली . सर्वं विद्यार्थ्यांनी यावेळी मंत्रासह सूर्य नमस्काराची प्रात्यक्षिके केली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एस. हसबनीस , पर्यवेक्षक आर. डी. देसाई सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वं विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!