ताज्या घडामोडी

ज्ञान गंगोत्री संस्थेच्या कायदेशीर सल्लागार पदी ॲड.नितीन दसवडकर यांची नियुक्ती

Spread the love

पुण्यातील या शाळेत महाराष्ट्राच्या अनेक भागातील विशेषतः ग्रामीण भागातील मतिमंद मुले शिक्षण घेत आहेत. ज्ञानगंगोत्री संस्थेत निवासी शिक्षण दिले जाते. या विशेष मुलांच्या कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी कायदेशीर सल्लागार पदी ॲड .नितीन दसवडकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.श्री नितीन दसवडकर हे महाराष्ट्र पत्रकार संघाचे पुणे जिल्हाचे ही कायदेविषयक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नुकताच ईगल फौंडेशनचा ईगल ब्रँन्ड आयकॉन अवॉर्डही प्राप्त झाला आहे. पुणे शहरात ज्ञानगंगोत्री या निवासी शाळेत महाराष्ट्रातील अनेक मुले मुली शिक्षण घेतात. गेली २२ वर्ष ही संस्था काम करते परंतु त्यांना कायदेशीर अडचणी येत होत्या.
त्यासाठी अध्यक्ष विक्रम कसबे यांनी सल्लागार पदी महाराष्ट्र पत्रकार संघाचे सल्लागार वकील नितिन
दसवडकर यांची नेमणूक केली आहे.समाजातील विशेष मुलांना कायदेशीर मदत करणार असल्याचे वकील नितिन यांनी नमूद केले.त्यांच्या या नियुक्ती बद्द्ल महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!