अध्यात्मिकआपला जिल्हासामाजिक

मकरसंक्राती निमित्त वाण देण्यासाठी हजारो महिलांची देहूमधे संत तुकोबांचे व आळंदीला संत ज्ञानोबा माऊलींचे दर्शनास गर्दी.

Spread the love

मकरसंक्राती निमित्त वाण देण्यासाठी हजारो महिलांची देहूमधे संत तुकोबांचे व आळंदीला संत ज्ञानोबा माऊलींचे दर्शनास गर्दी.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी १६ जानेवारी.

मकरसंक्राती निमित्त वाण देण्यासाठी हजारो महिलांची देहूमधे संत तुकोबांचे व आळंदीला संत ज्ञानोबा माऊलींचे दर्शनास गर्दी दिसून आली.संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासून सायंकाळी सात पर्यत पंचक्रोशितील महिला,भगिनी, मुली आणि काही थोड्याफार प्रमाणात पुरूष मंडळीही आली होती.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे जन्मठिकाण, शिळामंदिर, वडिलोपार्जित स्वयंभू श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर, तसेच गाथा मंदिर आणि वैकुंठगमन या ठिकाणी मोठ्या संख्येने महिलांची गर्दी होती.श्री तुकाराम महाराजांचे पाचही अवतार असलेल्या गाथा मंदिरात सकाळपासून महिलांची वाण वाटण्यासाठी गर्दी होती. शिळामंदिर व मुख्य स्वयंभू विठ्ठल रूक्मिणी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात हजारो महिला आलेल्या होत्या, त्यामुळे येथे पुरूषांना मज्जाव होता, असे येथील विश्वसनीय सूञांकडून तसेच संत तुकाराम महाराजांचे नववे वंशज ह.भ.प.अशोकमहाराज मोरे, देहूकर यांचेकडून समजले.

देहूमधे येथे लहान मुलामुलींचे करीता खेळण्यांची दुकाने, प्रसाद, हार, खाद्यपदार्थ यांची हाॕटेलमधे मोठी गर्दी होती.
ऊस, गाजर, बोरे, शेंगा, वाटाणा, वाल, पापडी आणि काही तीळ गुळ वड्या असे वाण घेवून महिलांनी येथे दर्शनाचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!