आरोग्य व शिक्षणमावळसामाजिक

संस्कृत भारती पुणे ग्रामीणचे “जनपद संमेलन” मोठ्या प्रतिसादात संपन्न !

Spread the love

संस्कृत भारती पुणे ग्रामीणचे* “जनपद संमेलन” मोठ्या प्रतिसादात संपन्न !Sanskrit Bharti Pune Gramin’s* “Janapada Sammelan” concluded with great response!

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १६ जानेवारी.

संस्कृत भारती पुणे ग्रामीण जनपद यांनी आयोजित केलेले “जनपद संमेलन” नुकतेच ‘ योगीराज हॉल तळेगांव ‘ येथे संपन्न झाले. या संमेलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

संमेलनाचा आरंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन- भारत माता आणि प्रभू रामचंद्रच्या पवित्र प्रसन्न प्रतिमा पूजनाने झाला. यावेळी, मदन गोपाल वार्ष्णेय (न्यासी , संस्कृत भारती )  दत्तात्रेय वज्रहळ्ळि ( अखिल भारतीय पदाधिकारी, संस्कृत भारती ) मोरेश्वर देवधर, डॉ शाळीग्राम भंडारी, वैद्य ज्योती मुंदर्गी इ मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी  वरद लेले यांनी केलेल्या शंखध्वनीने वातावरण दुमदुमून गेले.संस्कृत भारती पुणे ग्रामीण च्या वतीने  मंजूषा तेलंग यांनी सर्वांचे स्वागत केले. तत् पश्चात, महर्षी वेदव्यास वेदपाठ शाळा, आळंदी येथील विद्यार्थ्यांनी वेद मंत्रांचे पठन केले आणि वातावरण चैतन्यमय झाले.त्यांचे शिक्षक आचार्य विवेक या प्रसंगी उपस्थित होते.संस्कृत भारताची उद्दिष्टे, कार्यपद्धती स्पष्ट करणारे प्रास्ताविक  मोरेश्वर देवधर यांनी त्यानंतर केले.अतिथींपैकी नवोन्मेष शाळेचे प्रा अरगडे यांनी आपले त्यानंतर मनोगत व्यक्त केले.

उद्घाटनाकरिता प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या प्रख्यात गायक व पत्रकार  सुरेश साखवळकरांचे भाषण झाले.
ते म्हणाले.जगात साधारणपणे ४०,००० भाषा बोलल्या जातात. त्यातल्या २००० भाषा भारतात. तर महाराष्ट्रात ६०० भाषा प्रचलित आहेत. किमान आम्हा महाराष्ट्रीय लोकांना तरी संस्कृत भाषा बोलता आली पाहिजे, कारण या सर्व ६०० भाषांना संस्कृत खूप सोपी जाईल. असे मत व्यक्त केले. तीला पुनर्वैभव प्राप्त व्हावे यासाठी संस्कृत भारती अखंड कार्यरत आहे, त्यात मोठ्याप्रमाणात जनसामान्याने सहभागी व्हायला हवे आहे. अशा कार्यक्रमांची रचना त्याच साठी आहे.

या नंतर आशीर्वचन देण्यासाठी उपस्थित असलेल्या प्रख्यात वैद्य. मुंदर्गी यांनी सांगितलं, की आयुर्वेदाचा तर आत्माच संस्कृत आहे. संस्कृत ही ज्ञानाची तितकीच विज्ञानाची भाषा आहे. भारतातल्या ९७% भाषा संस्कृत मधूनच उगम पावल्या गेलेल्या आहेत. आपल्या पेक्षा जास्त, पाश्चात्यांनी आता संस्कृत भाषेचे महत्व ओळखले आहे. जर्मनीमध्ये १४ विद्यापीठात संस्कृत भाषा शिकवली जाते. अत्यंत प्रगत झालेले असे आपले स्थापत्य शास्त्र, खगोल, रसायन,भौतिक, गणित, भूमिती, अभियांत्रिकी ही सर्व शास्त्रे आपल्या कडे, संस्कृत मधूनच अतिशय प्रगत झाली. संगणकाकरिता देखिल हीच भाषा अतिशय उपयुक्त आहे हे इतक्यातच डॉ विजय भटकारांनी सिद्ध केलेलं आहे.

या भाषेचे रक्षण, संवर्धन आणि पुनरुथान होणे हे अतिशय गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या. डॉक्टर भंडारी हे संस्कृत संमेलनाकरिता पालक- अध्यक्ष. म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की– जगात तीन प्रकारची माणसं असतात. भोगी- -योगी – त्यागी त्यातील संस्कृत भारतीचे हे सर्व कार्यकर्ते योगी आणि त्यागी आहेत. संस्कृत भाषा, त्यातली सुंदर सुभाषिते ही जीवन कसं सुंदरतेने, प्रसन्नतेने जगावं हे सांगतात. एक फार उदार,उदात्त दृष्टिकोन या भाषेमुळे मिळतो आपल्या भाषणात त्यांनी खूप मार्मिक अशी सुभाषितं उद्धृत केली . संस्कृत भारती चे अभिलेखागार प्रमुख श्रीमान दत्तात्रय वज्रहळ्ळि यांनी आपल्या भाषणात संस्कृतमुळे संस्कृतीचे रक्षण होते.भारतभूमी चे मूळ संस्कृतात आहे! लोककल्याणा करिता संस्कृत भाषा अत्यंत महत्वाची आहे. कुटुंबरक्षण, समाजरक्षण राष्ट्रंरक्षण संस्कृत मुळे शक्य आहे असे प्रतिपादन केले.

या भाषणानंतर गटशः चर्चा झाली. चर्चेच्या शेवटी प्रत्येक गटप्रमुखांच्या द्वारे सर्वांनी भविष्यकाळात आपण हे संस्कृत भारतीचे कार्य सक्षमपणे पुढे नेऊ असा संकल्प केला.उत्तरार्धात प्रख्यात गायिका संपदा थिटे, यांच्या शिष्यांनी ” स्तोत्र- मंजिरी ” नावाचा कार्यक्रम Immediately सादर केला. त्यानंतर तळेगावच्या, स्वरगंधा भजनी मंडळ यांनी सुंदर भक्तीगीतांचा कार्यक्रम सादर केला. अखेरीस कन्या शाळा चाकण, येथील विद्यालयातील मुलींनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरिल संस्कृत गीत सादर केले. या वेळी, संजीव कुमार क्षेत्रिय संघटन मंत्री हे उपस्थित होते.

शेवटी समारोपाचे समर्पक असे भाषण , मदनगोपाल वार्ष्णेय (गुजरात) यांनी केले. आणि आनंद तेलंग यांनी गायलेल्या संपूर्ण वंदेमातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदानंद भिसे आणिअमेय जोशी यानी केले. आभार प्रदर्शन-डॉ चंद्रकांत देशमुख यांनी केले.

या कार्यक्रमाकरिता विशेष परिश्रम वसुधा ताई साठे, जोती ताई मुंगी, सोनल जोशी मंजूषा तेलंग यांनी केले . तसेच रुचिता जोशी निकिता बोरकर शीतल सुरलकर यांचे देखिल या करिता परिश्रम घेतले सदानंद भिसे, अमेय जोशी, आनंद तेलंग, ह्यांचा ह्या कार्यक्रमांची हातभार लागला आदित्य करंदीकर आणि शशी शेण्ड्ये ह्यांनी पुस्तक विक्रीकरिता मदत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!