आरोग्य व शिक्षण

औंढे खुर्द गावाचे हद्दीत गावठी दारूभट्टी पोलिसांकडून छापा टाकून उध्वस्त ; १ आरोपी अटक;

२ लाख ९६ हजाराचा अवैध गावठी दारू व कच्चे रसायन जप्त

Spread the love

लोणावळा : औंढे खुर्द गावाचे हद्दीत गावठी दारूभट्टी पोलिसांकडून छापा टाकण्यात येवून उध्वस्त करण्यात आली. यावेळी एक आरोपी अटक करण्यात आला. छाप्यात दोन लाख ९६ हजाराचा अवैध गावठी दारू व कच्चे रसायन जप्त करून जागचे जागीच नष्ट करण्यात आले.लोणावळा ग्रामिणचे पोलिस निरिक्षक प्रविण मोरे यांनी सहकारी अधिकारी , कर्मचारी यांचेसह छापा टाकून दारूचे बॕलर व रसायन नष्ट केले .

ता.३१ आॕगष्ट रोजी सायंकाळी चार वाजता पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.आरोपी अक्षय संग्रामसिंह राजपूत (वय-३१, रा-औंढे , ता-मावळ) असे अटक आरोपीचे नाव आहे.त्याचेवर भादवि कलम ३२८ दारुबंदी कायदा अधिनियम ६५(ख),(ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस हवालदार आमित ठोसर , ( लोणावळा ग्रामिण पोलिस स्टेशन ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस निरिक्षक प्रविण मोरे यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार सचिन बनकर , सहाय्यक फौजदार सिताराम.एस.बोकड आणि हवालदार श्री .ठोसर यांनी सुमारे २ लाख ९६ हजाराची गावठी दारू जप्त केली. २०० लीटर चे १२ बॕलर , त्यामध्ये २४०० लीटर व २५०० लीटर चे दोन मोठे बॕलर असे ५ हजार लीटर मिळून ७४०० लीटर गुळाचे व इतर पदार्थ यांचे आंबट व उग्र वासाचे गावठी दारू बनवायचे रसायन जप्त करून नष्ट केले.पुढील तपास फौजदार बनकर करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!