क्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्रमावळसामाजिक

नाट्यसंमेलनाच्या भव्य प्रारंभाप्रमाणेच सांगताही दिमाखदार करणार – आ. सुनील शेळके.

Spread the love

नाट्यसंमेलनाच्या भव्य प्रारंभाप्रमाणेच सांगताही दिमाखदार करणार – आ. सुनील शेळके.Just like the grand opening of the theater festival, Dimakhdar will also perform the performance. Sunil Shelke.

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर, १८ जानेवारी.

मोठी परंपरा असलेल्या १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची सांगता तळेगाव व मावळात होत आहे. ही आपल्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. नाट्यसंमेलन ज्या भव्यतेने साजरे झाले त्याची सांगताही त्याच दिमाखात साजरी करण्याचाच आमचा प्रयत्न राहील. त्यादृष्टीने येत्या बुधवारी (दि २४ जानेवारी ) होणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ या होणाऱ्या कार्यक्रमास मावळ व पुणे जिल्ह्यातील नाट्यरसिक आणि समस्त नागरिकांनी उपस्थित राहून हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करावा असे आवाहन . मावळचे आमदार श्री सुनील शेळके यांनी केले.

वरील कार्यक्रमाच्या सांगता समारंभाच्या मंडपाचे भूमिपूजन तसेच व्यासपीठ व प्रवेशद्वाराचे नामकरण आज संपन्न झाले. मावळचे आमदार श्री सुनील शेळके, नाट्यपरिषद तळेगाव शाखेचे- विश्वस्त सुरेश साखवळकर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. पिंपरी चिंचवडचे नाट्यपरिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर , कलापिनीचे नाट्य परिषद तळेगाव शाखेचे विश्वस्त डॉक्टर अनंत परांजपे, नाट्य परिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, प्रमुख कार्यवाह विश्वास देशपांडे तसेच तळेगावातील युवा नेते गणेश खांडगे, जेष्ठ नेते बबनराव भेगडे यांनी आमदार शेळके यांच्यासमवेत समारंभस्थळी शुभारंभाची कुदळ मारून, श्रीफळ वाढवून हा कार्यक्रम संपन्न झाला.

या मुख्य कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार श्री शेळके यांनी या कार्यक्रमाचे औचित्य राखीत नाट्यरसिकांना वरील आवाहन केले. या दोन्ही कार्यक्रमांना वरील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी भाऊसाहेब भोईर यांनी तळेगाव नगरी ही सर्व कला चळवळीची गंगोत्री असून येथील जेष्ठ कलाकार, मान्यवर संस्था म्हणजे आमची विद्यापीठे आहेत. त्यांच्याकडूनच आम्ही शिकलो. त्यांचे ऋण मानूनच भविष्यात नाट्यसंकुल व विविध कलांना सामावून घेणारे कलामंदिर निर्माण करता येईल का, असाच आमचा प्रयत्न असेल असे स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यातील नाट्य रसिकांनी आमच्या नाट्यसंमेलन व एकूणच उपक्रमांना भरभरून दाद दिली. त्याचाच कळस आपणास तळेगावात चढवायचा आहे. असे सांगून तळेगाव शाखेचा गौरवपूर्ण कार्यक्रमांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.नाट्यपरिषद तळेगाव शाखेचे विश्वस्त श्री सुरेश साखवळकर यांनी सर्व धर्म, पंथ व भिन्न अभिरुचींना एकत्र आणणारे माध्यम कला असते. ती महाराष्ट्रात व त्यातही तळेगावात फुलली, बहरली असून ही अभिमानास्पद बाब असल्याचे सांगितले.

कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी तळेगाव ही नाट्यरसिकांची, कलाकारांची खाण आहे. यापुढील तळेगावातील नाट्यसंमेलनाची ही नांदीच असल्याचे स्पष्ट केले.

नाट्यपरिषदेच्या तळेगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष  सुरेश धोत्रे यांनी १०० व्या नाट्यसंमेलनाच्या पुणे जिल्हा स्तरावरील सांगता समारंभाची रूपरेषा स्पष्ट केली. २४ जानेवारी, बुधवारी दुपारी ४ वाजता नाट्यदिंडी, संध्याकाळी ६ वाजता मुख्य सांगता समारंभ व त्यानंतर चला हवा येऊ द्या हा जगप्रसिद्ध कार्यक्रम या मालिकेचे सर्व लोकप्रिय कलाकार सादर करणार आहेत . तसेच हा समारंभ होत असलेल्या मुख्य प्रवेशद्वारास ‘श्रीमंत उमाबाई दाभाडेसाहेब’ व रंगमंचास तळेगावचे मानबिंदू असलेले जेष्ठ साहित्यिक कै. गो. नी. दांडेकर यांचे नाव देण्यात आले आहे. असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

या समारंभाच्या यशस्वीतेची तसेच मुख्य प्रायोजकत्वाची जवाबदारी आमदार  सुनील शेळके यांनी घेतल्याने आपण हा सांगता समारंभ तळेगाव मावळला शोभेल असा करू शकणार असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून स्पष्ट केले.
प्रारंभी आमदार श्री शेळके यांच्या हस्ते नटवराला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.

सूत्रसंचालन तळेगाव शाखेच्यावतीने होत असलेल्या नाट्य संमेलनाची सांगता समारंभाचे माध्यम समन्वयक प्रसाद पानसे यांनी केले. आभार नाट्यपरिषद तळेगाव शाखेचे संचालक राजेश बारणे यांनी मानले. या समारंभास नाट्यपरिषद तळेगाव शाखेचे संचालक तेजस धोत्रे, संजय वाडेकर, सुरेश दाभाडे, क्षिप्रसाधन भरड, प्रसाद मुंगी, संग्राम जगताप, डॉ. नयना डोळस, ब्रीजेन्द्र किल्लावाला, गोपाळ परदेशी, हरिश्चंद्र गडसिंग, डॉ मिलिंद निकम या संचालक मंडळाबरोबर कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी नाट्यपरिषद तळेगाव शाखा अध्यक्ष सुरेश धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सर्व संचालक मंडळ व हर्षल आल्पे, योगंधरा बढे, अमित बांदल, विनोद टकले, मिनल रणदिवे यांनी परिश्रम घेतले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!