क्रीडा व मनोरंजनसामाजिक

अध्यात्मातून व्यक्तिमत्व विकास राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरातून अनुभवता येतो. मा श्री नंदकुमार वाळंज.

Spread the love

अध्यात्मातून व्यक्तिमत्व विकास राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरातून अनुभवता येतो.
 नंदकुमार वाळंज.Personality development through spirituality can be experienced through special winter camps of National Service Scheme.Nandakumar Valll

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, १८ जानेवारी.

लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. बी. पुरंदरे कला. श्रीमती एस. जी. गुप्ता. व श्रीमती एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय लोनावळा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवशीय विशेष हिवाळी शिबीर मौजे गाव आंबवणे येथे आयोजित करण्यात आले असुन या शिबिराचे उद्धाटन कोराईगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध उदयोजक नंदकुमार वाळंज यांच्या हस्ते झाले . उद्घाटनाच्या वेळी मार्गदर्शन करताना भारतीय संस्कृतीचा अभिमान युवा पिढीने जोपासला पाहिजे .आधुनिक काळात सुद्धा आपण आपले आद्यात्म जोपासले पाहिजे. व आपला विकास साधला पाहिजे असा स्वंयसेवकांना संदेश अध्यक्षांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केला.

या वेळी लोनावळा एज्युकेशन ट्रस्टचे सचिव मा. अँड. निलीमा खिरे मॅडम स्वंयसेवकांना उद्देशून दूरदर्शन वरील दाखविलेल्या ग्रामीण भागातील मालिकेतील घटना, या प्रत्यक्ष खेडेगावात जाऊन अनुभवता येतात. ते शिबिरातून साध्य होते व अनेक गोष्टी जवळून अनुभवता येतात. असे आपल्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केले.

यावेळी शिबिराचे प्रास्ताविक करत असताना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व डॉ. पवन शिनगारे जिल्हा समन्वयक यांनी विषद केले . तसेच स्वयंसेवक शिबिरात राहून जे शिकणार आहेत ते पुढील काळात कसे फायदेशीर असते या विषयी माहिती दिली. स्वंयसेवकांना शिस्त व ग्रामीण भागातील जीवणमान समजुन घेण्याचे आव्हाण केले. या कार्यक्रमाच्या वेळी लोनावळा एज्युकेशन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्याचा सत्कार प्रभारी प्राचार्य डॉ. विलास पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला . या कार्यक्रमाच्या वेळी लो. ए. ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रय पाळेकर , मा. अँड अजय भोईर सहसचिव , शैलजा फासे विश्वस्त, मा. विशाल पाडाळे सी.डी.सी मेंबर्स, आणि मा.श्री. डॉ. दिगंबर दरेकर (सी.डी.सी मेंबर) उपसरपंच  सुनिल हुंडारे ग्रामसेवक राजेंद्र शिंदे, माजी नगरसेवक दिलीप दामोदर , जयेशसेठ उद्योजक मुंबई अक्षरा दळवी,  निलेश मेंगडे ग्रा. सदस्य आंबवणे , सोनू अनाजी वाळंज विदयालयाचे मुख्याध्यापक बी जी. देवरे सर, शिक्षक, कर्मचारी व महाविदयालयाचे शिक्षकवृंद व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस.एस. स्वंयसेवक प्रतिनिधी जयवंत दळवी याने केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी  धनराज पाटील सर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!