आपला जिल्हामहाराष्ट्रमावळ

मा.आदित्य साहेब ठाकरे यांची धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेस सदिच्छा भेट..

Spread the love

मा.आदित्य साहेब ठाकरे यांची धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेस सदिच्छा भेट..Mr. Aditya Saheb Thackeray’s goodwill visit to Dharmaveer Sambhaji Civil Cooperative Credit Institution..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २१ जानेवारी.

तळेगाव दाभाडे येथील नामांकित पतसंस्था धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे रौप्य महोत्सव सुरू असल्याने महाराष्ट्र राज्याचे शिवसेना नेते,पर्यटन व पर्यावरण मंत्री मा. आदित्यजी ठाकरे यांनी पतसंस्थेत सदिच्छा भेट दिली.

पतसंस्थेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. शिवप्रतिमा पूजन झाल्यानंतर पतसंस्थेचे संस्थापक खंडूजी टकले, अध्यक्ष विनोद टकले, सचिव संजय शिंदे, खजिनदार सुधीर खांबेटे, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमास शिवसेना उपनेते पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिनजी आहेर, मावळ विधानसभा संपर्क प्रमुख प्रभाकरजी पवार,  मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, उप जिल्हा प्रमुख सुरेश गायकवाड, लोणावळा शहर संघटक साधना चौधरी, समन्वय प्रमुख रमेश जाधव, लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, तळेगाव शहर प्रमुख शंकर भेगडे, महिला पुणे जिल्हा प्रमुख शैलजाताई खंडागळे, महिला तळेगाव शहर प्रमुख संगीताताई सोनवणे, तळेगाव शहर कार्याध्यक्ष सतिश गरुड व मावळ तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

मा.ठाकरे साहेबांनी पतसंस्थेच्या कामकाजाचे कौतुक केले व पतसंस्थेची अशीच प्रगती होत राहो अशा शुभेच्छा दिल्या. तसेच या वेळी पतसंस्थेचे सर्व संचालक विजय शेटे, संतोष परदेशी, दत्तात्रय शिंदे, केशव कुल, किरण किल्लावाला, आदित्य टकले, संकेत खळदे, दत्तात्रय साळुंखे, कर्मचारी वर्ग व दै.बचत प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!