अध्यात्मिकमावळ

आयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा उत्सवानिमित्त तळेगाव स्टेशन येथे पालखी प्रदक्षिणेचे आयोजन.

पालखी प्रदक्षिणेत नागरिकांना सहभागी होण्याचे संयोजकांचे आवाहन.

Spread the love

आयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा उत्सवानिमित्त तळेगाव स्टेशन येथे पालखी प्रदक्षिणेचे आयोजन ; पालखी प्रदक्षिणेत नागरिकांना सहभागी होण्याचे संयोजकांचे आवाहन.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २१ जानेवारी.

आयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा उत्सवाचा आपण सर्वजण आनंद व भक्तीभाव द्विगुणीत करूया.

सोमवारी २२ जानेवारी रोजी ,पालखी प्रदक्षिणा पुढील मार्गाने मार्गस्थ होणार आहे.

श्री गणेश मंदिर राजगुरव कॉलनी येथून सकाळी साडेआठ वाजता प्रस्थान.टेल्को कॉलनी (आई तुळजाभवानी मंदिर येथे स्वागत) फलके वाडी, जुने सेवाधाम.जैन मंदिर वैभव बिल्डिंग, कपिष बिल्डिंग राजगुरव कॉलनी गणेश मंदिर येथे सांगता होणार आहे.

तसेच पालखीचे स्वागत होणार आहे श्री गौरी गणेश महिला भजनी मंडळाचे भजन, रामरक्षा पठण, संगीतगीत रामायण, राञी ९ वा . दिपोत्सव व महाआरती होणार आहे

सर्व अबाल वृद्ध, माता, भगिनींनी आपापल्या ठिकाणाहून पालखी प्रदक्षिणात सहभागी होण्याची व शक्यतो पारंपारिक वेशात येऊन बालचमुंच्या या श्री. रामभक्ती सोहळ्याचा आनंद घेण्याची संयोजकांनी विनंती केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!