आपला जिल्हा

बारामती येथे २२ जानेवारी रोजी अयोध्या उत्सवानिमित्त मांसाहारी हॉटेल व मांस विक्री बंद ठेवण्यासाठी नगरपरिषदेश निवेदन..

Spread the love

बारामती येथे २२ जानेवारी रोजी अयोध्या उत्सवानिमित्त मांसाहारी हॉटेल व मांस विक्री बंद ठेवण्यासाठी नगरपरिषदेश निवेदन A statement to the municipal council to close non-vegetarian hotels and meat sales on January 22 at Baramati on the occasion of Ayodhya festival

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, २० जानेवारी.

बारामती :- बारामती शहर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी बारामती नगर परिषदेचे, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडे दिनांक 22 रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्री राम उत्सवानिमित्त बारामती शहर व तालुका येथील सर्व मांसाहारी हॉटेल मौस विक्री ते तसेच मध्यपानची दुकाने हे बंद ठेवण्यासाठी आध्यात्मिक आघाडीचे शैलेश खरात यांच्या पत्राद्वारे निवेदन दिले.

दरम्यान 22 तारखेला होणाऱ्या श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेदिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तरी बारामती शहरात सकल हिंदू समाजाने कोठेही श्रीरामांचे फलक लावल्यास त्यांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये व काही ठिकाणी विशिष्ट स्टेज साऊंड सिस्टिम व उत्सव साजरा होणार आहे त्या ठिकाणच्या परवाने रीतसर घेण्यात आले त्याचबरोबर बारामती नगर परिषदेवर विद्युत रोषणाई करून उत्सव साजरा करावा अशीही विनंती करण्यात आली.

यावेळेस भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष सुजित वायसे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते शहाजी कदम भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा आत्ताच यांची भारतीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्य पदी निवड झालेले मुकेश वाघेला सरचिटणीस प्रमोद डिंबळे चंद्रकांत केंगार अल्पसंख्यांक बारामती शहराध्यक्ष मुन्ना तांबोळी भारतीय जनता पार्टी बारामती शहर चे कोषाध्यक्ष अभिजीत पवार हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!