महाराष्ट्र

विधुत विभागाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात आमरण उपोषण

Spread the love

भंडारा : जिल्हाधिकारी कार्यालय समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार ) भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांच्या नेतृ्वात, विधुत विभागाच्या वतीने जुल्मी निर्णय मागे घेण्याच्या संदर्भात आमरण उपोषण वर बसले आहेत.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाच्या वतीने 31/1/ 2024 ला CE/ B & R recovery /03411 या पत्राद्वारे बिल संदर्भात थकबाकी दारांना पूर्ण बिल भरण्याकरता जुलमी निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाने भंडारा जिल्ह्यातील अनेक विद्युत ग्राहकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागनार आहे. यांची दखल घेता आणी जनतेची समस्या पाहता अजय मेश्राम पुढे सरसावले.

अजय मेश्रामनी पुढे सांगितले की, थक बाकीदारांना बिल भरण्यास मुदत देण्यात यावी. प्रीपेड मीटर संबंधी पायाभूत सुविधा दिल्याशिवाय लावू नये. प्रीपेड मीटर लावल्याशिवाय सक्ती करू नये. शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा करण्यात यावा.आणि जिथपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तिथपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा प्रशासनाला इशारा सुद्धा दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!