आरोग्य व शिक्षण

मातृभाषा हे संवादाचे उत्कृष्ट माध्यम – प्राचार्या डॉ. बिंदू सैनी

एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

Spread the love

प्रतिनिधी श्रावणी कामत

पिंपरी (दि. २९ फेब्रुवारी २०२४) जागतिकीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे व्यवहारिक व ज्ञानभाषा म्हणून इतर भाषा वापरल्या जातात. परंतु कौशल्य आत्मसात करण्यासाठी, एखादी नव संकल्पना समजून घेणे किंव्हा प्रभावीपणे सादर करण्यासाठी आपली मातृभाषा हेच संवादाचे उत्कृष्ट माध्यम आहे असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. बिंदू सैनी यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी मराठी राजभाषा दिन निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. सैनी बोलत होत्या. इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. यामधे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे नाटक सादर केले. गायन, नृत्य, पारंपरिक लोकगीते देखील सादर केली. अशिता भोंडवे या विद्यार्थिनीने मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. वंदना सांगळे, मंजुषा नाथे, सुनीता पाटील, योगिता देशमुख, सुचिता फूलारी आणि जयश्री काळे या शिक्षिकांनी देखील मार्गदर्शन केले.

एस. बी. पाटील स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी मराठी राजभाषा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!