महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या इमारतीची पायाभरणी

९ मजले आणि २६ कोर्ट हॉल

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरिफ सा. डॉक्टर आणि पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवडचे दिवाणी न्यायाधीश राजेश वानखेडे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांच्यासह आणि वकील यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.

दि. १ मार्च १९८९ साली पिंपरी-चिंचवड न्यायालयाची स्थापना झाली. मात्र, अद्याप इमारतीचा प्रश्न सुटला नव्हता.

मोशी येथे एकूण ९ मजले आणि २६ कोर्ट हॉल अशी पिंपरी-चिंचवड न्यायालयाची इमारत उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये रेन रुफ वॉटर हार्वेस्टिंग, प्रशस्त फर्निचर, अग्निशमन यंत्रणा, वाहनतळ, वातानुकुलन यंत्रणा, लिफ्ट, सी.सी.टी.व्ही. सिस्टिम अशा आधुनिक सुविधा असतील. जिल्हा न्यायालय, वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, मोटर व्हेईकल कोर्ट, कौटुंबिक न्यायालय, सहकार न्यायालय, कामगार न्यायालय तसेच न्यायाधीशांसाठी निवासस्थान आदींचा समावेश आहे. न्यायसंकुल उभारण्यासाठी पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या हद्दीत बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील सेक्टर नंबर – १४ येथे सुमारे १६ एकर जागा महाराष्ट्र शासनाने मंजूर केली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!