आपला जिल्हा

मेट्रोचे वाहनतळ १० मार्चपासून होणार सुरू; ‘हे’ आहेत वाहनतळ असणारी स्थानके

पुणे मेट्रोच्या आठ स्थानकांवर दुचाकी व चारचाकी वाहने उभी करण्यासाठी सशुल्क जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, या स्थानकांवरील वाहनतळ (दि. १०) मार्चपासून सुरू होणार आहेत.

Spread the love

पुणे : पुणे मेट्रोच्या आठ स्थानकांवर दुचाकी व चारचाकी वाहने उभी करण्यासाठी सशुल्क जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, या स्थानकांवरील वाहनतळ (दि. १०) मार्चपासून सुरू होणार आहेत. या सर्व वाहनतळांवर बूम बॅरियर बसविण्यात आले आहेत. सिमेंटीकरण करण्यात आले आहे.

वाहनांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. त्या ठिकाणी पुरेशी वीज व्यवस्था असेल, प्रवाशांना वाहनतळांवर अॅपद्वारेही शुल्क भरता येईल. अॅपद्वारे बुकिंग, डिजिटल पेमेंट करता येईल. पार्किंग क्षमता दर्शविणारे डिजिटल बोर्डही असणार आहेत. सदर कामे बहुतांशी ठिकाणी पूर्ण झाली आहेत. मेट्रो प्रवाशांना वाहनतळाच्या शुल्कात २५ टक्के सवलत तसेच मेट्रोचा मासिक पास असलेल्या प्रवाशांनाच वाहनतळाचा मासिक पास दिला जाणार आहे.

मेट्रो पुण्यात काही मोजक्याच स्थानकादरम्यान धावते. वाहनतळ नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. पुण्यात पिंपरी-चिंचवड, संत तुकाराम नगर, फुगेवाडी, बोपोडी, शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय, मंगळवार पेठ आणि आयडियल कॉलनी या आठ स्थानकांवर वाहनतळाची सुविधा आहे. हे वाहनतळ प्रवाशांसाठी आधी मोफत होती. मात्र, आता मेट्रो प्रशासाने या ठिकाणी कंत्राटदार नेमले असून, आता या ठिकाणी वाहने पार्क करण्यासाठी पैसे वसूल केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!