मावळ

ढोल वादनानंतर आता थकबाकीदारांच्या नावाचे फलक लावणार चौका चौकात. तळेगाव दाभाडे येथे करवसुली साठी नवी पद्धत

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने मालमत्ताकराच्या वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरा समोर ढोल वाजवायला सुरुवात केली आहे. वसूलीसाठीच्या या अनोख्या पद्धतीमुळे थकबाकीदारांकडून आत्तापर्यंत लाखो रुपयांचा थकीत कर जमा झाल्याची माहिती वसूली पथकाकडून मिळाली.

नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कर थकविला आहे. यामुळे तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन.के.पाटील यांनी मिळकतधारकांना नोटीसा दिल्या. त्यानंतरही नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पालिकेने थकबाकीदारांच्या दारात जाऊन ढोल वाजवायला सुरुवात केली.

यासाठी थकबाकीदारांचे नावाचे फलकही चौका चौकात लावण्याचा विचार पालिका करीत असल्याची माहिती तळेगाव नगरपरिषदचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी दिली.या महिन्यात शंभर टक्के कर वसुल करून वीस कोटी रुपये नगरपरिषदेच्या कोषागारात जमा करण्याचा निश्चय मुख्याधिकारी यांनी केला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!