आपला जिल्हा

एकाच दिवसात १.१५ कोटी रुपयांच्या मिळकतकराची वसुली

पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाची ५६ मिळकतींवर कारवाई

Spread the love

पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून शहरात विविध ठिकाणी मिळकत कर न भरणाऱ्या व्यावसायिक मिळकतींवर जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. मिळकतकर विभागाने शनिवारी (दि. १५) शिवाजीनगर येथील एकूण ५६ मिळकतींवर जप्तीची कारवाई केली. त्यामुळे संबंधित मिळकत धारकाने तत्काळ १ कोटी १५ लाख रुपयांचा मिळकतकर पालिकेकडे जमा केला.

 

मिळकतकर आकारणी आणि कर संकलन विभागाने ‘सीविक मिरर’ला याबाबत माहिती दिली. मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप, महापालिका सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे , सहाय्यक आयुक्त मते, प्रशासन अधिकारी रविंद्र धावरे व संजय शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 

शिवाजीनगर येथील पेठ-झोन-२ येथील पलाश रियल्टर्स एलएलपीच्या बिगर निवासी मिळकतीचा कर थकवण्यात आला होता. त्यामुळे उपायुक्त जगताप यांच्या नेतृत्वाखाली जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये ५६ विविध मिळकती होत्या. 

जप्तीची कारवाई केल्यानंतर संबंधित मालकाने तत्काळ कराच्या रकमेचा धनादेश आणून दिला. या कारवाईत पालिकेने १ कोटी १५ लाख ३७ हजार २०३ रुपये वसूल केले. विभागीय निरीक्षक प्रकाश कुरतडकर यांच्या पथकासह वसूली पथकाने ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!