आपला जिल्हा

काँग्रेसकडून पुण्यात रवींद्र धंगेकर

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चारी मुंड्या चित करणारे आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

Spread the love

पुणे: कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (BJP) चारी मुंड्या चित करणारे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना काँग्रेसकडून पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

त्यामुळे पुण्यात मुरलीधर मोहोळ विरुध्द धंगेकर अशी लढत रंगणार आहे. कॉंग्रेसने गुरुवारी देशातील ५७ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये पुण्यातून धंगेकर, कोल्हापूरमधून शाहू महाराज, साेलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे लढणार आहेत.

पुण्यात कॉंग्रेसकडून (Congress) मोहन जोशी (Mohan Joshi), अरविंद शिंदे (Arvind Shinde), आबा बागूल (Aba Bagul) इच्छुक होते. मात्र, कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रकाशझोतात आलेले धंगेकर यांची निवड कॉंग्रेसने केली आहे.

धंगेकर हे मूळ शिवसेनेचे असून राज ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेले होते. चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. २००९ मध्ये त्यांनी मनसेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांचा अवघ्या ७ हजार मतांनी पराभव झाला होता. २०१४ मध्येही त्यांनी कसबा पेठेतून पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली होती. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

२०१९ मध्ये काँग्रेसमधून विधानसभेच्या उमेदवारीसाठी ते इच्छुक होते. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पाेटनिवडणुकीत त्यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला होता. संपूर्ण राज्यात ही निवडणूक गाजली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!