ताज्या घडामोडी

भाषा जनाची, भाषा मनाची’ बोधवाक्यावर शिक्कामोर्तब

Spread the love

मराठी भाषा विभागाचे पाऊल पडते पुढे
सांगली (प्रा.दिलीप जाधव ) : मराठी भाषेच्या प्रचार-प्रसार आणि संवर्धनाच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांत वापर व्हावा यासाठी राज्य शासनाच्या मराठी विभागाने बोधचिन्ह आणि घोषवाक्यास आज मान्यता दिल्याचे जाहीर केले आहे.
हे बोधचिन्ह मराठी मनाला आकृष्ट करून घेणारे असून त्यावर ‘मराठी भाषा विभाग’असे ठसठशीत मुद्रण असलेले शब्द कोरण्यात आली आहेत. हे बोधचिन्ह दीप आकारातील असून त्याचा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, वाचन प्रेरणा दिन, मराठी भाषा गौरव दिन आणि प्रायोजकत्व स्वीकारलेल्या कार्यक्रमांतील भित्तीपत्रकांत, दर्शनी भागावर लावण्यात येणाऱ्या फलकांवर, वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत वापर करण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. तसेच बोधचिन्हाखाली ‘भाषा जनाची, भाषा मनाची’ या समर्पक व मनोहरी घोषवाक्याची निवड करण्यात आली आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या या बोधचिन्हाचे सारस्वत व सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ व मराठीप्रेमी मंडळींकडून स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!