आरोग्य व शिक्षण

शिक्षकांचे चारित्र्य हेच राष्ट्राचे चारित्र्य – लायन प्रकाश नारके

Spread the love

चिंचवड : येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा इंटरनॅशनल स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचा सामुहिक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. त्यावेळी आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबच्या जिल्हा शिक्षण विभागाचे अध्यक्ष ला. प्रकाश नारके बोलत होते. यावेळी कमला शिक्षण संकुलचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी व्यासपीठावरती ला. सुनिल चेकर, ला. संध्या नारके, ला. अमिता बाळ सराफ, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, डॉ. पोर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्‍हाडे, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्याध्यापिका सविता टॅ्रव्हीस उपस्थित होते.

ला. प्रकाश नारके मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षणाबरोबर चारित्र्य, करूणा, धैर्य, एकात्मता आणि निष्ठा याचे शिक्षण देत असतात. त्यामुळेच विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडते. विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडविणारा चारित्र्यवान शिक्षक हेच राष्ट्राचे चारित्र्य असते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दीपक शहा यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या कारकिर्दीतील गुरूंना अभिवादन करून अनेक शैक्षणिक आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा गायकवाड यांनी तर, आभार मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!