आरोग्य व शिक्षण

मिळकत कर थकबाकीदारांच्या तक्रारीबाबत पालिका आयुक्तांनी लक्ष घालावे – रामलिंग देशमाने

Spread the love

चिंचवड : पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने येत्या 25 सप्टेंबर रोजी मिळकत कर थकबाकीदारांसाठी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन निगडी प्राधिकरण विभागीय कार्यालयांतर्गत विविध प्रकरणाची सुनावणी आकुर्डी येथील महापालिका न्यायालयासह शहरातील 15 विभागीय करसंकलन कार्यालयांमध्ये कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून होणार असल्याचे महापालिका उपायुक्त स्मिता झगडे यांनी जाहीर केले आहे. याचे सामाजिक क्षेत्रातील कार्यरत “आपला माणूस“ संस्थेचे प्रदेश अध्यक्ष चिंचवड येथील रामलिंग देशमाने यांनी स्वागत केले आहे.

अनेक मिळकत करधारकांनी वारंवार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर विभागाला नोटीसा, पत्र देवूनही सदर मिळकत नावावर करून देत नाही, त्यामुळे विलंब होतो. नाहक मिळकत करधारकांच्या मिळकतीवर शास्तीकर व इतर कर दंडावर दंड व व्याज लादला जातो. मुळ देय रक्कमेतही मोठी वाढ होते. त्यामुळे अनेकांवर मानसिक दबाव वाढत आहे. वेळ, पैसा वाया जातो.

वास्तविक महाराष्ट्र शासनाच्या बदली व विलंब कायद्याच्या परिपत्रकानुसार क्र.संकिर्ण-02/2010/प्रक्र.29/अ-2 दि.16/02/2010 मधील तरतुदीनुसार 12 आठवड्यात निर्णय घेणे व निर्णयास उत्तर देणे बंधनकारक आहे, असे असतानाही पालिकेच्या संबंधित विभाग अधिकारी, कर्मचार्‍यांनी मिळकत करधारकांच्या निवेदनाकडे, नोटीसा, पत्रव्यवहाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्याचा त्रास मिळकतकर धारकांसमवेत त्यांच्या कुटुंबियांनादेखील होत आहे. ही कार्यपद्धती अत्यंत चुकीची आहे. यासाठी पालिका आयुक्त डॉ. राजेश पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालून मिळकत करधारकांच्या विविध प्रकरणात त्यांना आर्थिक दिलासा देणारा योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी “आपला माणूस“ संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. शहरातील शेकडो मिळकत धारकांना कोरोना प्रादुर्भाव काळात मदत होईल. याबाबत आज ई-मेलद्वारे याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन आज दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!