आरोग्य व शिक्षण

वडगावमध्ये पथदिवे खांब उभारणीच्या कामास सुरुवात

Spread the love

वडगाव :  येथील वडगाव नगरपंचायत हद्दीतील 7 नियोजित प्रभागांमध्ये पहिल्या टप्प्यात 90 लाख रुपये किमतीचे पथदिवे खांब उभारण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाना अंतर्गत वडगावचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून या कामास सुरुवात झाली आहे.

वडगावचे नगरसेवक राजेंद्र कुडे व नगरसेविका माया चव्हाण यांच्या प्रभागातून पथदिवे खांब उभारण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला आहे. यानंतर इतर 6 प्रभागात कामास सुरवात करण्यात येईल.

प्रभागानूसार निधी –

१) प्रभाग क्रमांक ३ – ११ लक्ष ४६ हजार रूपये

२) प्रभाग क्रमांक ४ – १४ लक्ष ४३ हजार रूपये

३) प्रभाग क्रमांक ५ – १० लक्ष ७४ हजार रूपये

४) प्रभाग क्रमांक ६ – १२ लक्ष ९१ हजार रूपये

५) प्रभाग क्रमांक ८ – ९ लक्ष ४७ हजार रूपये

६) प्रभाग क्रमांक १० – १२ लक्ष १२ हजार रूपये

७) प्रभाग क्रमांक १५ -१८ लक्ष ९ हजार रूपये

या सात प्रभागातील सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित प्रभागात पुढील कालावधीत पथदिवे खांब उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.तसेच पथदिवे बसविले जाणार आहेत अशी माहिती नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!