आरोग्य व शिक्षण

ज्येष्ठ नागरिकांसाठी डॉ. शाळीग्राम भंडारी यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Spread the love

 

तळेगाव : मावळ तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती व जेष्ठ नागरिक मित्र मंडळ तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्मृतिभ्रंश दिनाचे औचित्य साधून डॉ. शाळीग्राम भंडारी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. विजया भंडारी दादा-दादी पार्क येथील पुष्पावती बवले सभागृहात झालेल्या कार्यक्रमात वाढत्या वयातील स्मृतीभ्रंश (अल्झायमर) या आजाराविषयी डॉ. शाळीग्राम भंडारी यांनी अगदी सोप्या शब्दांमध्ये माहिती दिली. प्रेक्षकांनीही या आजाराविषयी प्रश्न विचारून त्यांच्या मनातील शंकाकुशंका दूर केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सुधाकर रोम्बोटकर यांनी केले. सदस्य प्राची साठे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. तर राधेशाम भंडारी यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्ष सुधाकर रेम्बोटकर, मावळ तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नामदेव डफळ, साहित्य परिषद तळेगाव शाखा अध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!