आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

वाहन नोंदणी प्रणालीत ‘बीएच सिरीजचा’ तात्काळ समावेश करावा – दीपक मोढवे पाटील

Spread the love

 

चिंचवड : केंद्र सरकारच्या वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना काढून बीएच सिरीजची घोषणा केली. राज्य सरकारने त्याला मंजुरी दिली. असे असतानाही परिवहन विभागाने अद्याप वाहन नोंदणी प्रणालीत या सिरीजचा समावेश केलेला नाही. या सिरीजचा नोंदणी प्रणालीत तात्काळ समावेश करावा अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सद्यस्थितीत दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर चारचाकी अथवा दुचाकीची त्या शहरातील आरटीओ कार्यालयात जाऊन नोंदणी करावी लागते. त्यासाठी खर्च व जुन्या आरटीओची एनओसी द्यावी लागते. त्यामुळे परिवहन विभागाने वाहन धारकांच्या सुविधेसाठी बीएच सीरीजचा समावेश वाहन प्रणालीत करावा अशी आमची आग्रहाची मागणी आहे असे मोढवे यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!