आरोग्य व शिक्षण

10 ऑक्टोबर पासून हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरू होणार

Spread the love

पुणे : गेल्या काही वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम 10 ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल.

राज्य सरकारने 18 जुलै 2018 रोजी या प्रकल्पास महत्त्वकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित केले आहे. देशातील सार्वजनिक खाजगी भागीदारी तील हा पहिला प्रकल्प असणार आहे. 2018 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र भूसंपादन व काही तांत्रिक अडचणीमुळे प्रकल्पाचे काम थांबले होते.

भूसंपादनासह इतर तांत्रिक अडचणी दूर झाल्यामुळे 10 ऑक्टोबरला प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!