ताज्या घडामोडी

मुंबई शहरचे माजी संयुक्त कार्यवाह, वडेश्वर मंडळाचे संस्थापक व कबड्डी खेळाडू अनंत लोके निर्वतले.

Spread the love

मुंबई:- मुंबई शहर कबड्डी असो.चे माजी संयुक्त कार्यवाह व जेष्ठ कार्यकारणी सदस्य अनंत लोके यांचे रवि. दि. १८ सप्टेंबर रोजी पहाटे १-००च्या सुमारास वृद्धपकाळाने निधन झाले. निधना समयी ते ८२वर्षाचे होते. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुली(सर्व विवाहित), व नातवंडे असा परिवार आहे. लालबागच्या प्रसिद्ध वडेश्वर मंडळाचे ते संस्थापक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वडेश्वर मंडळाने १३ कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले. लालबागच्या पेरू कंपाऊंडच्या या स्पर्धेत खेळण्यासाठी मुंबईतील नामांकित संघात चढाओढ लागत असे. यास्पर्धेने कित्येक खेळाडूंना नावलौकित मिळवून दिला.
त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मंडळाने आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त काळाचौकी-अभ्युदय नगर येथे अखिल भारतीयस्तरावरील कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. वडेश्वर मंडळाची स्थापना करूनच ते थांबले नाही, तर ते त्या संघात मध्यरक्षकाची भूमिका पार पाडत असत. चढाईत ते बसून बैठी लाथ मारून हमखास गडी टिपत असत. जवळपास २० ते २५ वर्ष ते मुंबई संघटनेत सदस्य म्हणून कार्यरत होते. काही काळ त्यांनी मुंबई संघटनेचे संयुक्त कार्यवाह म्हणून देखील काम पाहिले. त्याच दिवशी मुंबईतील भोईवाडा स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अग्नी संस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!