आरोग्य व शिक्षणसामाजिक

जागतिक दिव्यांग दिन सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.

20 डिसेंबर 2023 रोजी मायमर वैद्यकीय महाविद्यालय, सुश्रुत हॉल, तळेगाव दाभाडे येथे बक्षीस वितरण सोहळा घेण्यात आला.

Spread the love

जागतिक दिव्यांग दिन सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.The prize distribution ceremony of the winners of various competitions held on the occasion of the World Day of Persons with Disabilities week was concluded.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी २१ डिसेंबर.

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे, पुणे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती मावळ समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण विभाग व मायमर वैद्यकीय महाविद्यालय , डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालय तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरण सोहळा दि. 20 डिसेंबर 2023 रोजी मायमर वैद्यकीय महाविद्यालय, सुश्रुत हॉल, तळेगाव दाभाडे येथे बक्षीस वितरण सोहळा घेण्यात आला.

जागतिक दिव्यांग दिन सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धा वेशभूषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, ऑनलाइन गायन व ऑनलाइन नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या . सदर स्पर्धेमध्ये 70 विद्यार्थ्यांनी सहभागघेतला.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, आत्मविश्वास वाढविणे, प्रोत्साहन देणे, कौतुक करणे, जीवनातील आनंद मिळवून देणे या उद्देशाने सदर कार्यक्रम घेण्यात आला.

स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्रक देऊन कौतुक करण्यात आले तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे प्रशस्तिपत्रक देऊन कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी गायन व नृत्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. मावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय  सुदाम वाळुंज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बक्षिस वितरण सोहळा घेण्यात आला.

सदर कार्यक्रमास वडगाव नगरपंचायतचे नगरसेवक  भूषण मुथा  यांनी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रशस्तिपत्र उपलब्ध करून दिले , पंचायत समिती मावळच्या शिक्षण विस्तार अधिकारी  सुजाता शिंदे मॅडम विद्यार्थ्यांना खाऊ दिला, मायमर हॉस्पिटलचे वैद्यकीय  दर्पण महेशगौरी अधिक्षक यांनी हॉल उपलब्ध करून दिला  कृष्णा भांगरे  यांनी पुष्पगुच्छ उपलब्ध करून दिले.

सदर कार्यक्रमास पंचायत समिती मावळ विभागाच्या विस्तार अधिकारी सुजाता शिंदे मॅडम, मायमर वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. दत्तात्रय गोपाळघरे, फिजिओथेरपीस्ट डॉ. सुमित्रा साखवळकर मॅडम मेडिकल सोशल वर्कर  अश्विनी वनारसे मॅडम, पुनम मॅडम, ललिता मॅडम, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका राजश्री घोरपडे मॅडम , विषयतज्ञ  ज्योती लावरे मॅडम उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या वेळी मान्यवरांचे स्वागत सुमित्रा कचरे यांनी केले. प्रास्ताविक शितल शिशुपाल मॅडम यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता जगताप मॅडम व शकीला शेख मॅडम यांनी केले. विजेत्या विद्यार्थ्यांचे नाव व बक्षिस  साधना काळे, शितल शिशुपाल  लता वनवे मॅडम यांनी घोषित केली . बक्षिस वितरण सोहळ्याचे नियोजन समावेशित शिक्षण विभागाच्या विशेष साधन व्यक्ती  शीतल शिशुपाल, विशेष शिक्षिका  स्मिता जगताप, साधना काळे, सुमित्रा कचरे,  शकीला शेख, लता वनवे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!