आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनसामाजिक

वाळंज विद्यालयात भरला विज्ञान मेळावा.

आंबवणे येथे वाळंज विद्यालयात भव्य शालेय विज्ञान मेळाव्या चे आयोजन करण्यात आले.

Spread the love

वाळंज विद्यालयात भरला विज्ञान मेळावा Science fair held at Valanj Vidyalaya

आवाज न्यूज : प्रतिनिधी, २१ डिसेंबर.

५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन 2023 निमित्त राज्यात विज्ञान पंधरवडा ” साजरा करण्याचे व तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या पूर्वतयारीने आंबवणे येथे वाळंज विद्यालयात भव्य शालेय विज्ञान मेळाव्या चे आयोजन करण्यात आले. आरंभी प्रमुख पाहुणे  सुनील हुंडारे विद्यमान उपसरपंच आंबवणे यांच्या शुभ हस्ते फीत कापून विज्ञान मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.या प्रसंगी विद्यमान ग्रामपंचायत सदस्या अक्षरा दळवी व मेघा नेवास्कर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष उल्हासभाऊ मानकर, शालेय पोषण आहार समिती अध्यक्ष सोपान दळवी, आरोग्य समिती मा. अध्यक्ष नवनाथ दळवी, जि प शाळा मुख्याध्यापक बेंद्रे सर शिक्षक पालक संघांचे अध्यक्ष योगेश वाळंज, सदस्य मनोज जंगम, सा. कार्यकर्ते सचिनभाऊ चव्हाण, सा. कार्यकर्ते अंकुशभाऊ मेंगडे, दीपकभाऊ दळवी,रामभाऊ मोढवे, आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचे उत्तम सादरीकरण केले, टाकाऊ पासून टिकाऊ, कमीत कमी खर्चात आपल्या उपकरणातुन वैज्ञानिक दृष्टीकोन दाखवण्याचा प्रयत्न केला.
उद्घाटनानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

मुख्याध्यापक भटू देवरे यांनी प्रास्ताविक केले व विज्ञान मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला.संजय कुलथे व राहुल आवळे या विज्ञान शिक्षकांनी प्रदर्शनातील उपकरणासाठी मार्गदर्शन केले.ग्रामस्थ, पालक यांनी मोठया संख्येने मेळाव्यात भेट दिली. व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.मा आदर्श सरपंच वत्सलाताई वाळंज व कोराईगड शिक्षण संस्थेच्या संचालिका यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!