Puneमावळलोणावळासामाजिक

पुणे ते लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढणार

खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश

Spread the love

पुणे ते लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढणार ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश..Pune to Lonavala local trips will increase; Success in the pursuit of MP Srirang Barane.

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, २२ डिसेंबर.

पुणे ते लोणावळा लोकल दुपारच्या वेळी सुमारे ४.३० तास बंद असतात. तो वेळ कमी केला जाईल व दुपारी दोन फेऱ्या होतील. तसेच सिंहगड एक्स्प्रेसला होणाऱ्या उशिराची कारणे शोधून ती वेळेवर कशी पोहचेल, यासाठी प्रयत्न केले जातील.

पुणे स्टेशनची सुरक्षा वाढविली जाईल. तर, कासारवाडी येथील गेट नंबर ४१ येथे रोड ओव्हर ब्रीज करण्यात येईल, आदींबाबत चर्चा करण्यात आली. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेवरून आरपीएफला धारेवर धरले.

पुणे रेल्वे विभागीय सल्लागार समितीची बैठक बुधवारी झाली. या बैठकीमध्ये पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक इंदु दुबे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, डॉ. रामदास भिसे व आरपीएफचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थित सदस्यांनी प्रवाशांच्या सुविधा व समस्यांबाबत सूचना देऊन रेल्वे प्रशासनाशी चर्चा केली. दुबे यांनी प्रश्नांवर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला डीआरयूसीसीचे सदस्य शिवनाथ बियाणी, गोपाल तिवारी, बशीर सुतार, सुरेश माने, किशोर भोरावत, निखिल काची, तानाजी कराळे, डाॅ. आप्पासाहेब शिंदे, अजित चौगुले, दिलीप बटवाल, विजय चव्हाण उपस्थित होते.

या बैठकीत पिंपरी चिंचवडविषयी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच रेल्वे स्थानकावर एका अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचार्याने केलेल्या कृत्यावरून स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेवरून सदस्यांनी आरपीएफला जाब विचारला. तसेच गाड्यांना उशीर होणे, स्वच्छता, सीसीटीव्ही, लिफ्ट आणि प्रवाशांच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षितता आणि अवैध व्यवसायांवर कारवाई करणे, पुणे स्थानकावर पुरेशा प्रमाणात दिशादर्शक फलक लावणे, लिफ्ट आणि एस्केलेटरची सुविधा, सीसीटीव्ही, सुरक्षा, पार्किंग समस्येवर तोडगा, प्रवासी सुविधा विकसित करणे, अतिक्रमणमुक्त रेल्वे परिसर आणि हडपसर रेल्वे स्थानकावर कोच इंडिकेटर असे विविध मुद्दे सदस्यांनी उपस्थित केले.

पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेसला चिंचवड येथे थांबा देणे
पुणे-लोणावळा दरम्यान लोकलची संख्या वाढवणे आणि दुपारच्या लोकल सुरू करणे
कासारवाडी गेट क्रमांक ४१ येथे रोड ओव्हर ब्रीज करणे
कासारवाडी येथे सुरक्षा भिंत बांधणार

सदस्यांनी केलेल्या मागण्या
पुणे-कोल्हापूर दरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करणे,
मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरू करणे.
पुणे-अहमदाबाद, पुणे-भुज, पुणे-बिकानेर आणि दौंड-इंदूर इत्यादी मार्गांचा मिरज आणि कोल्हापूरपर्यंत विस्तार.
– कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन रोज धावणे, हजरत निजामुद्दीन – गोवा, कोल्हापूर – अहमदाबाद, कोल्हापूर – मुंबई, दादर – म्हैसूर शरावती एक्स्प्रेस, दादर – पुद्दुचेरी एक्स्प्रेसचा लोणंद येथे थांबा,
यशवंतपूर संपर्क क्रांती, हमसफर एक्स्प्रेसचा सातारा येथे थांबा.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश आहे. त्यांच्या मुळे दुपारच्या वेळी लोकलच्या फेऱया वाढविण्यात येणार आहे. रोजच सिंहगड एक्‍सप्रेसला उशिर होतो. कर्जतपर्यंत एक्‍सप्रेस वेळेत पोहचते. मात्र, दादरपर्यंत तिला उशिर होतो. कर्जतनंतरचा परिसर हा मुंबईच्या हद्दीत येत असल्याने मुंबई विभागाची चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेसला चिंचवड येथे थांबा देण्याबाबत चर्चा झाली. कासारवाडी येथे सुरक्षेच्या दृष्टिनेही उपाययोजना करण्यात येणार आहेत.
बशिर सुतार, सदस्य, पुणे रेल्वे विभागीय सल्लागार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!