ताज्या घडामोडी

धनगर धर्म पीठ चा ऐतिहासिक सुवर्ण महोत्सवी आठवडी सतसंग सोमवार दिनांक ०३।०१|२०२२ सांयकाळी ८ते १०.ऑनलाइन

Spread the love

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll०६जानेवारी२०१८ रोजी धनगर धर्मपीठ संस्थेतेची स्थापना झाली.प्रा.डाॅ. अभिमन्यु टकले यांनी सर्व फाईल तयार केली पण धर्मादाय आयुक्त साहेब धर्म पीठ नोंदणी देत नव्हते.फाईल एक वर्षे पडून होती. तुम्ही संपुर्ण धर्म ताब्यात घ्यायला निघाले आहेत व उद्देश तसेच आहेत म्हणून फाईल अनेक वेळेस फेटाळली गेली. नोकरीत असल्याने वेळ नव्हता शेवटी ती फाईल श्री अर्जुन दादा सलगर च्या ताब्यात दिली आणि धनगर धर्म पीठ रजिस्टर झाले.धर्म, शिक्षण, साहित्य,शेती आरोग्य हे उद्देश असलेले व्यासपीठ म्हणजे धनगर धर्म पीठ. वर्षे भरा पुर्वी कार्य सुरू झाले.श्री विनायक काळदाते, यांनी कार्य अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतली. ऑनलाइन राज्य भर प्रचार प्रसार झाला.कोरोना मुळे राज्य भरातील धर्म साहित्या तील पंडीत व धर्म प्रतीनिधी, संत,सर्व समाजातील धर्म गुरू यांच्या भेटी राहून गेलेल्या आहेत. धर्म परिषद ही झाली नाही. नुकतेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या राजकीय व धार्मिक कार्याचा वारसा जपत श्री श्री योगी आदित्यनाथ यांनी वाराणशी येथे धर्मोद्दार केला व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा भव्य पुतळा ही उभारला. समस्त मानव कल्याणा साठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या राजकीय कार्य बरोबर धार्मिक कार्याचा वारसा जतन करणे खूप महत्त्वपूर्ण आहे.त्याचाच एक भाग म्हणून आपण धर्म पीठ स्थापन करून खारीचा वाटा उचलेला आहे.श्री विनायक काळदाते, श्री प्रभाकर दिवनाले, सौ. शारदा, श्री ज्ञानेश्वर ढोमणे, हभप कळंब महाराज, हभप कोल्हे महाराज, हभप घोडस्कर महाराज, कचरे महाराज, असे अनेक लोक एकत्र येवून अखंड ५० आठवडे सतसंग करत आहेत .श्री बापूसाहेब हटकर केंद्रीय अध्यक्ष हे ही मार्गदर्शन करत असतात.
🚩जे जे आपणासी ठावे l ते ते इतरांसी सांगावे l शहाणे करून सोडावे l सकळ जण .
प्रमुख अतिथी मा.हरिदासजी भदे,मा.आ.अकोला.
मा.रामरावजी वडकुते मा.आ.हिंगोली.
मा.मुरहरी केळे साहेब प्रमुख, त्रिपुरा राज्य विद्यूत मंडळ.मा.श्री.चोपडे सर अध्यक्ष, आ.धनगर साहित्य संमेलन, सांगोला.तसेच विविध क्षेत्रात कार्यरत समाजधुरीण.सत् संगती सदा घडो। सुजन वाक्य कानी पडो’ असं म्हणतात. माणसाला चांगल्याची संगत परमार्थात नि प्रपंचातही महत्त्वाची आहे. सत् संगतीसाठी घर सोडून बाहेरच जायला हवं, असं नाही, तर संतांच्या ग्रंथाचं वाचन, मनन, चिंतन ही सत्संगतीच होय. सत्संगाशिवाय विवेक नाही. विवेकाशिवाय ज्ञान नाही. सत्संग हा आनंदाचा पाया आहे. साधन-सिद्धींचं फळही आहे. ‘सत् संगतीनं माझं मनोरथ पूर्ण झालं, माझा अवघा शीणभार गेला. दारिद्र्य दूर पळालं, जन्माचं सार्थक झालं,’ अशा आशय-अनुभुतीचे कितीतरी अभंग आहेत.
धार्मिक व्यासपीठावरुन समाजाचे प्रबोधन करून समाजाचा धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य तसेच सामाजिक व राजकीय विकास साधन्याच्या उद्देशाने कार्यरत धनगर धर्मपीठ मागील ५०आठवड्यांपासून दर सोमवारी आँनलाईन सत्संग आयोजित करत असतो.
या सोमवारी दिनांक ३जानेवारी २०२२ रोजी संध्या. ७वा. धर्मपीठाचा ऐतिहासिक असा ५०वा सत्संग आहे. या सत्संगाला ह.भ.प.मंडळी सोबतच समाजातील सामाजिक, राजकीय, प्रशासन, शेती,उद्योग ,साहित्य,व्यवसाय, शैक्षणिक क्षेत्रातील समाजधुरीण सुद्धा सहभागी होतील व आपल्या प्रबोधातून समाजाचे प्रबोधन करतील.
आपण सर्वांनी या ऐतिहासिक आँनलाईन सत्संगाला हजेरी लावावी ही विनंती.सत्संगामध्ये जाँईन होण्यासाठी लिंक
To join the meeting on Google Meet, click this link:
https://meet.google.com/bgs-rzeh-ibn

Or open Meet and enter this code: 1234567..विनायक काळदाते.फोन:8208568546

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!