ताज्या घडामोडी

तेली ज्ञाती संघ महाल सैतवडे खंडाळा येथे श्री ,जगनाडे महाराज पुण्यतिथी साजरी

Spread the love

खंडाळा वार्ताहर 

प्रतीवर्षा प्रमाणे श्री .संत जगनाडे महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. १ जानेवारी २०२२ रोजी वाटद खंडाळा येथे तेली जाती संघ महाल सैतवडे च्या ज्ञाती बांधवांच्या वास्तू मध्ये श्री .संत जगनाडे महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली .श्री .संताजी जगनाडे महाराज यांची विधीयुक्त पूजा करण्यात आली .महाराज यांच्या पूजेनंतर श्री सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते .श्री संत जगनाडे महाराज व श्री सत्यनारायणाच्या पुजेच्या दर्शनासाठी सैतवडे ,, वाटद खंडाळा , सांडेलावगण ,जयगड ,नांदिवडे , रिळ , मालगुंड , निवेंडी , गणपतीपुळेत ,कोळीसरे या गावातील तेली ज्ञाती बांधवाणी दर्शनाचा लाभ घेतला .या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात ज्ञाती बांधव व मिञ परीवार उपस्थित होता .या तेली ज्ञाती संघ सैतवडे महाल खंडाळा या मंडळाचे अध्यक्ष श्री .गणेश झगडे ,उपाध्यक्ष नितिन झगडे ,सचिव राजेंद्र रसाळ , खजिनदार दिलीप राऊत व सर्व ज्ञाती बांधवांणी रत्नागिरीच्या तेली समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष श्री .रघुवीर शेलार , तालुकाध्यक्ष श्री .बाबा नाचणकर ,महिला जिल्हाध्यक्ष कल्पना लांजेकर ,दिपक राऊत ,शरद कोतवडेकर ,अशोक नाचणकर ,योगेश पावसकर ,सुभाष लांजेकर यांचा सत्कार करण्यात आला .तेली ज्ञाती संघ सैतवडे महाल खंडाळाच्या महिला भगीणींचा हळदि कुंकू कार्यक्रम करण्यात आला.व राञी मंडळाचे अध्यक्ष श्री .गणेश झगडे यांच्या संगीत भजनाची बारी झाली त्याला पकवाज साथ ओंकार झगडे यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!