क्रीडा व मनोरंजन

रायझिंग प्लेअर्सच्या विजयात प्यारेलाल, श्रीराम चमकले

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

ठाणे : प्यारेलाल चौहान आणि श्रीराम अय्यर या तळाच्या फलंदाजांनी केलेल्या चिवट फलंदाजीच्या जोरावर रायझिंग प्लेअर्स क्रिकेट क्लबने यजमान भिवंडी तालुका क्रिकेट संघटनेचा एक विकेटनी पराभव करत मर्यादित ४० षटकांच्या डीटीसीए चषक सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले.

डीटीसीएच्या मैदानावर रंगलेल्या या उपांत्यपूर्व फेरीच्या रोमहर्षक लढतीत यजमानांनी ३८ षटकात २०३ धावा उभारल्या. मोनिश भोईरने धडाकेबाज फलंदाजी करताना ३२ चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकार ठोकत ४३ धावा केल्या. त्याला चांगली साथ देताना अजय पाटीलने चार चौकार मारत ४२ धावा केल्या. रायझिंग प्लेअर्सच्या सोमिल काहुने ३७ धावा देत तीन विकेट मिळवल्या. आशिष मोरणकरने २१ धावामध्ये २ फलंदाज बाद केले. दीपेश कदम, श्रीराम अय्यर आणि प्यारेलाल चौहानने प्रत्येकी एक विकेट मिळवली. द्विशतकी धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना रायझिंग प्लेअर्स चा संघ डीटीसीएच्या गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यापुढे ८ बाद १६८ असा ढेपाळला होता. संघ अडचणीत असताना तळाच्या प्यारेलाल आणि श्रीरामने संयमी फलंदाजी करत संघाला ३५ व्या षटकात ९ बाद २०६ असा विजय मिळवून दिला.स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या प्यारेलालने पुन्हा एकदा आपली छाप पाडताना ४४ चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या. या नाबाद अर्धशतकी खेळीत आठ चौकार आणि एक षटकार ठोकला. तर मोक्याच्या क्षणी प्यारेलालला साथ देत १२ चेंडूत एक चौकार मारत नाबाद १२ धावा केल्या. त्याआधी प्रथम पवारने (३०), आशिष मोरणकरने (२४) आणि जय शिंदेने २१ धावा केल्या होत्या. संघाला विजयाची आस दाखवताना रवींद्र प्रजापतीने २५ धावत ३, अजय जैस्वाल, नवीन शर्मा आणि आकाश पाठकने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक :
भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशन : ४० सर्वबाद २०३ ( अजय पाटील ४२, मोनिश भोईर ४३, अमरजित सिंग २०,सोमिल काहु ७ -० – ३७-३, आशिष मोरणकर ४.४ -०- २१-२ ) पराभूत विरुद्ध रायझिंग प्लेअर्स क्रिकेट क्लब : ३५ शतकात ९ बाद २०९ ( प्यारेलाल चौहान नाबाद ५५, श्रीराम अय्यर नाबाद १२, प्रथम पवार ३०, आशिष मोरणकर २४, जय शिंदे २०, रवींद्र प्रजापती ४-०-२५-३, अजय जैस्वाल ६-०-२९-२, नवीन शर्मा ८-०-२९-२, आकाश पाठक ५-०-२९-२)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!