आरोग्य व शिक्षण

सेकंड ओपिनियन म्हहत्वाचेच ! – लेखक हर्षल आल्पे

Spread the love

आवाज न्यूज :  आयुष्यात सेकंड ओपिनियन फार महत्वाचे आहे , प्रत्येक टप्प्यावर निर्णय घेताना आपल्याला दुस-या बाजूने दिलेला सल्ला हा लागतोच लागतो . मग तो दुस-याने दिलेला असू दे किंवा स्वत:च्या मनानेच दुस-या बाजूने विचार केलेला असू दे , तो ही सल्ला विचारात घ्यावाच लागतो . मुळात कुणी ही हा दावा करू शकत नाही , की “ मी कधीच कुणाचा सल्ला न घेता निर्णय घेऊन यशस्वी झालोय” हा दावा करण्याइतके काही आपण स्वयंभू नाही . आपण जरी किती ही आव आणला तरी कुणी तरी कुणाला तरी काही तरी सल्ला देतोच , आणि तो प्रत्येकच वेळेला टाकाऊ नसतो आणि 100 % टिकाऊ सल्ला ही कुणीच देत नाही . पण हे ठरवायचे कसे ? की हा टाकाऊ आहे की नाही , हा ही सल्ला घेण्याचाच प्रश्न आहे . आणि यावर सल्ला देणारा मी अजून शोधतोय . सापडेल कधी तरी , अचानक मध्ये …

मुळात सल्ला हा शब्द जन्माला का येतो ? हा प्रश्न आपल्या अंतर्गत भितीवर अवलंबून आहे . ही भीती च आपल्याला सल्ला घेण्यास किंवा त्या पासून दूर जाण्यास भाग पाडते . आणि ही भीती अपयशाचीच असते . यशाची तर आपल्याला कधीच भीती वाटत नाही . खरतर मनुष्यप्राणी आणि इतर प्राण्यांमध्ये हाच मूलभूत फरक आहे . इतर प्राणी परिणामांची पर्वा न करता बिनधास्त निर्णय घेऊन मोकळे होतात , आपण मात्र अपयशाला भिऊन काही वेळेला निर्णयच घेत नाही . निर्णय लांबणीवर टाकणे हा शापच आहे . “ बघू” हा शब्द तसा नाही या शब्दाचा समानअर्थी आहे . शब्दकोशामध्ये हा बघू हा शब्द नाहीये , पण ! वास्तवात हा आहे , आणि याच्याशिवाय भाषा तयार होतच नाही . पण त्या बघू ला ही विचार करायला लावणारा सल्ला ही समोर येत असतो , आणि तोच मानला पाहिजे , निदान त्याचा सन्मान केला पाहिजे , कारण कदाचित त्यातच आपले हित लपलेले असते .

एक महान शिक्षक असलेले अत्यंत साधे गृहस्थ माझे शिक्षक दराडे सर मध्ये मला माझ्या शाळेत मी खूप वर्षानी गेल्यावर भेटले . त्यांनी भेटल्यावर मिठी च मारली मला , त्यांना भेटल्यावर खूप आठवणींना उजाळा मिळाला , त्यांनीच पहिल्यांदा मला गॅदरिंग मध्ये नाटकात प्रमुख भूमिका “तात्या” ही मिळवून दिली , मी पाठांतरात कच्चा होतो , किंवा डोक्यात भलत्याच गोष्टी अडकल्याने ते संवाद डोक्यात राहात नव्हते . प्रचंड अडखळत होतो , त्यांनीच मला वर्गाच्या बाहेर एकटाच बसवले . प्रॅक्टीस संपेपर्यंत शाळा सुटेपर्यन्त एका कोप-यात मी एकटाच उभा होतो . अख्खी शाळा रिकामी झाली , तेव्हा ते सर आले माझ्यापाशी , त्यावेळी त्यांनी दिलेला सल्ला आज कळतोय . की उगाचच निर्माण केलेल्या फालतू भीतीला घाबरशील तर आपण का जगतोय हा प्रश्न निर्माण करशील , पण जर शांतपणे , थांबून बिनधास्त निर्णय घेशील तर जास्त यशस्वी होशील . हा त्यांनी दिलेला सल्ला ही मला अशावेळी आठवला जेव्हा असे वाटायला लागले आहे , की आपण अडकत चाललोय का ? किंवा पुढे जाण्याचे मार्ग आपल्यासाठी खुंटले आहेत का ? मान सन्मान याच्या ही पलीकडे आपण जाऊ शकतो का ? आपण आपल्या ख-या स्वप्नांच्या पासून दूर चाललो आहोत का ? केवळ लेखनकला किंवा बातमीलेखन याच साठी आपली जडणघडण झाली आहे का ? या सगळ्या विचारचक्रात अडकलो असतानाच दराडे सरांचा हा सल्ला आठवला . आणि प्रश्न एका वाक्यावर येऊन थांबले ते ही त्यांचेच की , “ प्रश्नपत्रिकेतच उत्तर लपलेले असते फक्त ते आपल्याला शोधायचे असते ,ते योग्यरित्या शोधले की आपण यशस्वी होतोच होतो .” या सल्ल्यानेच मला दिशा निश्चित मिळाली . आणि तो प्रयन्त्न चालू आहे . आणि तसे ही आपण जीवनाच्या या परीक्षेत सगळेच जण प्रश्नपत्रिकाच तर सोडवतोय . आणि मागील दोन वर्षे तर ही परीक्षा जास्तीच कठीण झाली होती , कारण वर्गाचे दार आणि खिडकी बंद केलेले होते आणि आपआपल्या बंदिस्त बॉक्स मध्ये आपल्याला पेपर सोडवायला भाग पाडले होते . एकमेकांना भेटणे दुरापास्त तर सल्ला कुठून मिळणार ? बर ! समोरची सल्ला देणारी व्यक्ति ही कठीण पेपर सोडवतीये , तर ती तिचा सोडवेल की आपल्याला मदत करेल . बर ह्या पेपरचा अभ्यास च आपला झालेला नव्हता . आपण भलत्याच पेपर चा अभ्यास करून गेलेलो आणि आला भलताच .अजून ही परीक्षा काही संपलेली नाही , उलट अभ्यासक्रमात लॉक डाउन हा नवा अवघड विषय आलाय .

पण आता बहुतेक आपण तयार असू , या अवघड विषयाला , कारण अनुभवाने खूप गोष्टी शिकवल्या आहेत , आणि आपल्याला सल्ला ही मिळूच शकतो . एक नाही पटला तर सेकंड ओपिनियन आपण घेऊच शकतो . मेडिकलच्या क्षेत्रामध्ये या सेकंड ओपिनियन ला फार म्हहत्व आहे , हे आज सांगायची वेळ आलीये . आपल्यातले काही जण फक्त या सगळ्याला घाबरून आपल्यातून निघून गेलेत , हे सुद्धा एक वास्तव आहे , जे आपण नाकारू शकत नाही . आजूबाजूला खूप भीतीदायक वातावरण असताना दराडे सरांनीच दिलेल्या सल्ल्याप्रमाणेच थांबून बिनधास्त निर्णय घेशील तर आणि तरच यशस्वी होशील , हा विचारच आपण करायला हवा . यात फक्त घाबरून न जाता शांतपणे आरड्याओरड्याला बळी न पडता शांतपणे सल्ला देणार्याबचा सल्ला आपण ऐकायला हवा आणि त्यावर विचार करायला हवा .

आणि ज्या गोष्टी हातात नाहीत त्याची भीती बाळगायचे काहीच कारण नाहीये ,उलट ज्या गोष्टी घडतआहेत ते अनुभव आहेत , आणि त्याच्याकडे सकारात्मक बघून त्यावर सेकंड ओपिनियन घेणे महत्वाचे , मग ते मनाचे असो किंवा अनोळखी व्यक्तीचे असो , या सेकंड ओपिनियन मध्येच सगळ्या प्रश्नांची उत्तरे लपली आहेत , आणि चष्म्याच्या दुस-या काचेने ही हे जग बघणे महत्वाचे आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!