ताज्या घडामोडी

कोतोली फाट्यावर ऊसाचा ट्रेलर पलटला

Spread the love

आसुर्ले-पोर्ले येथील दालमिया साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणार्या हिंदुस्तान ट्रॅक्टरचा एक नंबरचा ट्रेलर कोतोली फाट्यावरील वळणावर पलटला.
भादोले येथील ऊस घेऊन ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.09 डी 7047 भुयेमार्गे कोतोली फाटा येथे आला असता,कोतोली रस्त्याकडे डावीकडे वळण घेत असताना ऊस ज्यास्त भरल्यामुळे तोल जाऊन एक नंबरचा ट्रेलर डाव्या बाजूस पलटला.सुदैवाने यामधे कोणतीही जिवितहानी झाली नाही.
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील कोतोली फाट्याकडे जाणार्या रस्त्याची उंची कमी असल्यामुळे येथे वारंवार ट्रेलर पलटी होत असल्यामुळे या रस्त्याची उंची वाढवण्याची मागणी रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ.अभिजीत जाधव यांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!