ताज्या घडामोडी

शिराळा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भरत

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा तालुका पत्रकार संघाच्या तालुकाअध्यक्षपदी भरत गुंडगे यांची तर कार्याध्यक्षपदी सुमंत महाजन यांची एक मताने निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाशी ,संलग्नित असणाऱ्या शिराळा तालुका पत्रकार संघाने अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा उपक्रम राबविले आहेत.अश्या पत्रकार संघाची सन 2022 करिता नूतन कार्यकारणी गठीत करण्यासाठी नुकतीच शिराळा येथे ,जेष्ठ पत्रकार सुमंत महाजन ,जिल्हा समन्वयक रविंद्र कदम तालुका पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष विजय पाटील,पत्रकार गंगाराम पाटील,नारायण घोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.
या वेळी संघाची कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली. -अध्यक्ष-भरत गुंडगे (आरळा), कार्याध्यक्ष सुमंत महाजन (शिराळा) उपाध्यक्ष -राजेंद्र दिवाण (मांगले), अविनाश जाधव (कोकरूड), सरचिटणीस नारायण घोडे(कोकरूड),चिटणीस-आनंद सुतार (शेडगेवाडी),सचिव-अजित शिंदे(सागाव),कोषाध्यक्ष -ज्ञानदेव शिंदे(मांगले) ,तालुका संघटक गंगाराम पाटील ,कायदा सल्लागार ॲडव्होकेट सुरज परदेशी (शिराळा) ,जिल्हा प्रतिनिधी भगवान शेवडे ,रविंद्र कदम,प्रकाश मोहरेकर
शिराळा तालुका पत्रकार संघ हा सर्वाधिक पत्रकार सभासद असलेला पत्रकार संघ आहे.पत्रकारांच्या न्याय व हक्कासह सामाजिक उन्नतीसाठी सदैव कटिबद्ध असलेला संघ ,म्हणून पत्रकार संघाने ओळख निर्माण केली आहे.
—————————————-
दरवर्षी उत्कृष्ट लिखाण करणाऱ्या शिराळा तालुक्यातील पत्रकारास महाजन गॅस व शिराळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन उत्कृष्ट पत्रकार म्हणून गौरविण्यात येणार असल्याचे कार्याध्यक्ष सुमंत महाजन व जिल्हा समन्वयक रविंद्र कदम यांनी वेळी जाहीर केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे,संपादक हणमंतराव मोहिते,संघटक प्रकाश कांबळे,जेष्ठ समीक्षक प्रा.वैजनाथ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाचे काम सुरू आहे.शिराळा तालुका पत्रकार संघ आणखी मजबूत करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे नूतन पदाधिकारी यांनी वेळी सांगितले .सूत्रसंचालन भगवान शेवडे यांनी केले.
या वेळी नूतन अध्यक्ष भरत गुंडगे पत्रकार जी.जी. पाटील,अजित शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी पत्रकार बाजीराव घोडे यांची कोकरूड सोसायटीच्या उपाध्यक्षपदी नि वड झालेबद्दल व नूतन कार्यकारणी मधील पदाधिकारी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.या वेळी पत्रकार संघाचे सहदेव खवरे,,शिवाजी कुंभार, नथुराम कुंभार,धनाजी आसवले,गणेश माने ,महादेव देसाई आदींसह सदस्य उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!