देश विदेशमहाराष्ट्र

नांगरे पाटील म्हणजे मविआचे माफिया ; सोमय्यांचा खळबळजनक आरोप

Spread the love

दिल्ली : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी थेट सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडीचे माफिया आहेत असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी दिल्लीत मीडियाशी संवाद साधताना आरोप केला. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील हे ठाकरे सरकारचे माफिया म्हणून काम करत आहेत. त्यांनी मला गैरकायदेशीरपणे घरात कोंडून ठेवले.सीएसटी स्टेशनच्या बाहेर कोंडून ठेवले. ते सूचना देत होते. ते सीनियर पोलीस अधिकारी आहेत. एज्युकेटेड अधिकारी आहेत. परमवीर सिंग 100 कोटींच्या वसुलीत सहभागी झाले. यांचा एसीपी 50 लाखांची सुपारी घेतो आणि नांगरे-पाटील हे माफिया सारखे वागत आहेत अशी टीका सोमय्या यांनी यावेळी बोलताना केली.

नांगरे पाटलांनी विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. मला घरात कोडण्यात आले होते. ते सूचना देत होते. मिहिर कोटेचा, प्रवीण दरेकर ही तिथेच होते. मला नजर कैदेत ठेवण्याची ऑर्डर नसल्याचे माहित होते तर नांगरे पाटलांनी मुलुंड पोलिसांवर अॅक्शन का घेतली नाही? नांगरे पाटील यांना गृहमंत्री आश्वासन देत होते तर त्यांनी तसे सांगावे असे आव्हानच सोमय्या यांनी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!