आरोग्य व शिक्षण

वडेश्वर येथील आदिवासी आश्रम शाळेच्या दुरुस्तीसाठी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर

Spread the love

मावळ : अंदर मावळातील वडेश्वर येथे असणाऱ्या शासकीय आदिवासी आश्रम शाळेच्या दुरुस्तीसाठी आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याने जिल्हा नियोजन समिती अंतर्गत आदिवासी उपयोजनेतून 80 लाख 66 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या आश्रम शाळेची स्थापना 1978 साली झाली आहे. शाळेच्या जुन्या झालेल्या इमारतीत सध्या पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग आहेत. शाळेत एकूण 430 विद्यार्थी शिक्षण घेत असून वस्तीग्रह 347 निवासी विद्यार्थी आहेत.

मावळात आलेल्या निसर्ग व तोक्ते चक्रीवादळामुळे शाळेचे व वसतीगृहाचे प्रचंड नुकसान झाले. या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक प्रा. दहिफळे यांनी आमदार शेळके यांना शाळेच्या दुरवस्थेची सविस्तर माहिती दिली.त्यानंतर आमदारांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून या आश्रम शाळेच्या इमारतीची डागडुजी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2021 – 22 अंतर्गत आदिवासी उपाय योजनेच्या माध्यमातून 80 लाख 66 हजार रुपयांचा निधी मंजूर करून दिला. लवकरच आश्रमशाळेच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!